नागपुरात बहीण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना
एबीपी माझा वेब टीम | 17 Aug 2016 06:02 PM (IST)
नागपूर: नागपुरातील पाचपावली परिसरात बहीण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना रक्षाबंधनाच्या आधी घडली आहे. पाचपावली परिसरातील तरुणाने बहिणीच्या गळ्यावर वार करून तिला गंभीर जखमी केले. आज दुपारच्या सुमारास दिपाली चौहान आणि ऋत्विज यांच्यामध्ये घरगुती कारणावरून वाद झाले. यावेळी ऋत्विजने रागाच्या भरात आपली बहीण दिपालीवर वार केले. यावेळी दिपाली गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर जखमी दिपालीला सरकारी रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. आरोपी भाऊ ऋत्विजला पोलिसांनी अटक केली आहे.