टॉयलेट एक 'दंड' कथा
एबीपी माझा वेब टीम | 26 Jul 2017 04:24 PM (IST)
उस्मानाबादमध्ये उघड्यावर शौचास बसणाऱ्या 53 जणांना अटक करून न्यायालयासमोर उभं करण्यात आलं.
उस्मानाबाद : उस्मानाबादमध्ये उघड्यावर शौचास बसणाऱ्या 53 जणांना अटक करून न्यायालयासमोर उभं करण्यात आलं. न्यायालयानेही प्रत्येकाला 1 हजाराचा दंड ठोठावून जामिनावर मुक्त केलं. उस्मानाबाद तालुक्यातल्या ढोकीत आज गुड मॉर्निंग पथकाने ही कारवाई केली. यापूर्वी गुलाबपुष्प देऊन पथकाने गांधीगिरी केली होती. नंतर 200 रूपये दंडही ठोठावला होता. पण त्यानंतरही ढोकीत उघड्यावर शौचास जाण्यास लोक कमी करत नव्हते. त्यामुळे जालिम उपाय म्हणून महिला-पुरूष तरूण-तरूणी असा भेदाभेद न करता मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 115, 117 नुसार गुन्हा दाखल करून लोटाबहाद्दरांना अटक करण्यात आली. नंतर न्यायालयाने 53 जणांना प्रत्येकी 1 हजाराचा दंड ठोठावला.