औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेला तोडफोडीमुळे गालबोट लागलं. विद्यार्थी संघटनांमध्ये झालेल्या वादाने या कार्यक्रमात अडथळा आला आणि विद्यापीठात एकच गोंधळ उडाला.

एकात्म मानव जीवन दर्शन या विषयवार डॉ. अशोक मोडक यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. विद्यापीठातील विद्यार्थी संघटना आणि बाहेरच्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम उधळून लावला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी दाखल झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी महात्मा फुले सभागृहाच्या दरवाजाच्या काचा फोडल्या.

या प्रकारानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तोफफोड करणाऱ्यांना ताब्यात घेतलं. मात्र याबाबत विद्यापीठ प्रशासनाने पोलीस स्थानकात तक्रार न दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नाही.