सांगलीत सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये भररस्त्यात हाणामारी
एबीपी माझा वेब टीम | 05 Sep 2019 01:03 PM (IST)
सुरुवातीला जत नगरपालिकेतील सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नगरसेवक आणि भाजपचे नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
सांगली : सांगलीच्या जत नगरपालिकेच्या मासिक सभेनंतर काल (4 सप्टेंबर) नगरसेवकांमध्ये जोरदार हाणामार झाली. भररस्त्यात झालेली ही मारहाण पाहण्यासाठी दोन्ही गटाच्या नगरसेवक आणि ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. अखेर नगरसेवकांनी मध्यस्थी करुन हा वाद मिटवण्यात आला. सुरुवातीला जत नगरपालिकेतील सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नगरसेवक आणि भाजपचे नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. थोड्या वेळाचे याचं रुपांतर हाणामारीत झालं. अखेर नगरसेवकांनी मध्यस्थी करुन हा वाद मिटवला. परंतु या हाणामारीमुळे पालिकेचं कामकाज बंद करण्यात आलं होतं.