सांगली जिल्ह्यातील किर्लोस्करवाडीत हा प्रकार घडल्याचं म्हटलं जात आहे. मांगूर हा गोड्या पाण्यातला मासा आणि एका बिनविषारी सापाची झुंज रस्त्यावर सुरु होती. पण पाण्याच्या बाहेर असतानाही या माशाने सापाला जबड्यात पकडलं होतं. पाण्याच्या बाहेरही जगणाऱ्या या वितभर माशाने हातभर लांब सापाला चांगलंच झुंजवलं.
खरंतर हा मासा या सापाचा शिकार होता. पण या घटनेत हा सापच या माशाचा शिकार होता होता वाचला. अखेर 20 मिनिटांच्या झुंजीनंतर माशाच्या तोंडातून सापाने सुटका करुन कसाबसा पळ काढला. पण ही झुंज आपल्या कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या तरुणांनी या माशाला पुन्हा पाण्यात सोडलं.
मांगूर मासा गोड्या पाण्यात, विशेषत: दलदलीच्या ठिकाणी आढळतो. श्वसनासाठी तो पृष्ठभागावर येतो. हा मासा नैसर्गिकरीत्या मिश्र आहारी आहे. हा मासा छोटे कीटक, प्राणी खातो.
पाहा व्हिडीओ