वर्धा : वर्धा जिल्ह्यामधील आर्वी तालुक्यातील बोरगाव हातला येथील रस्त्यावर खेळ करणाऱ्या गारुडीच्या संगतीने ‘राणी’ नावाच्या माकडीनीला दारुचं व्यसन लागलं. व्यसनामुळे या माकडीनीने अक्षरश: उच्छाद मांडला होता.


गावकऱ्यांना त्रास देणाऱ्या माकडीनीची माहिती वनविभागाला मिळाली. उच्छाद का घालत असेल, हे कळलं नसल्यानं माकडीनीला वर्ध्याच्या पिपरितील करुणाश्रमात आणण्यात आलं आणि उपचार सुरु झाला.

सुरुवातीला सर्वसामान्य प्राण्यांप्रमाणे उपचार सुरु झाला. पण प्रतिसाद न मिळाल्याने उच्छाद वाढला. मग काही तपासण्या झाल्या आणि जी माहिती पुढे आली, तेव्हा दारु पाजूनच अखेर उपचार सुरु झाला.

राणी माकडीनीला दारुचं व्यसन लागलं होतं. रोज सुमारे एक लिटर दारु पिण्याची तिला सवय लागली होती.

सतत आठ महिने दारु पाजून ही सवय हळूहळू कमी करत तिच्यावर उपचार झाले. दरम्यानच्या काळात राणीनं पिल्लाला जन्म दिला. आता ती दारु पिण्याच्या सवयीतून मुक्त झाली.