मुंबई : एफडीए कमिशनर अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. रेमडेसेवीर इंजेक्शन उत्पादक कंपन्यांकडून उपलब्ध करून घेण्यात आलेल्या अपयशामुळे बदली  करण्यात आली आहे. काळे यांच्यानंतर  परिमल सिंग यांच्याकडे एफडाए आयुक्त पदाची सूत्रे सोपवण्यात आली आहे. 


 देशासह राज्यात कोरोनाबाधितांवर उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रेमडेसिवीरवरुन चांगलीच जुंपल्याचं दिसत आहे. 'काळेंवर कारवाई करा, कॅबिनेटमध्ये अजित पवार, नवाब मलिक आणि जितेंद्र आव्हाड यांनी मागणी केली होती. विलेपार्ले पोलिस स्टेशनला घडलेला प्रकार, विरोधी पक्षाचा हस्तक्षेप आणि एफडीए आयुक्त काळेंनी दिलेल्या पत्रावर कॅबिनेटमध्ये व्यक्त  नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.