मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडायची असेल तर कडक लॉकडाऊन लागू करणे महत्वाचे आहे. त्यामुळेच राज्यात लॉकडाऊन लागण्याची दाट शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आता सुरु आहे. कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेतला जात आहे. या बैठकीतच लॉकडाऊनचा निर्णय होण्याची शक्यता आहे. बैठकीत 15 दिवस लॉकडाऊन लावण्याची मागणी मंत्र्यांची केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.


सध्या राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र त्यातही लोक रस्त्यावर फिरताना दिसत आहे. तसेच सार्वजनिक वाहतूकही अत्यावश्यक सेवेसाठी सुरु आहे. त्यामुळे कडक निर्बंध असले तरी त्याचा परिणाम हवा तेवढा होताना दिसत नाहीये.  


अत्यावश्यक वस्तूंची दुकाने 7 ते 11 खुली राहणार


राज्यातील सर्व किराणा, भाजी दुकाने, फळ दुकाने , डेअरी, बेकरी, कनफेकशनरी, सर्व खाद्य दुकाने ( चिकन, मटन, पोल्ट्री , फिश सह), कृषि उत्पादनशी संबंधित दुकाने , पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने, येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने ही दररोज सकाळी 7 ते सकाळी 11 या वेळेतच सुरू राहतील.  मात्र या दुकानांना सकाळी 7 ते रात्री 8 यावेळेत होम डिलिव्हरी करता येईल. स्थानिक प्रशासन त्यांच्या वेळांच्या बाबतीत परिस्थिती  पाहून निर्णय घेतील.


राज्यात सध्या  काय सुरु, काय बंद आहे?



  • लोकल, बस अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरु राहतील.

  • हॉटेल्स, रेस्टॉरंट टेक अवे सुरुच राहतील.

  • रस्त्यावरच्या ठेले वाल्यांनाही टेक अवेची घोषणा.

  • प्रार्थना स्थळं, शाळा आणि कॉलेज, खाजगी कोचिंग क्लासेस, सलून, स्पा आणि ब्युटी पार्लर बंद

  • रेस्टॉरंट्समध्ये बसून खाता येणार नाही.

  • अत्यावश्यक सेवा वगळता इतर कार्यालयं बंद

  • कामाशिवाय फिरण्यास बंदी

  • सर्व सार्वजनिक ठिकाणं बंद

  • धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक सभांवर बंदी