लातूर : मुलगी नेहमी रडते म्हणून एका निर्दयी पित्याने आपल्या एक वर्षाच्या चिमुकलीची गळा दाबून हत्या आहे. माणुसकीला आणि नात्याला काळिमा फासणारी घटना ही घटना निटूर येथे गुरुवारी सायंकाळी घडली. पोलिसांनी शिवाजी लाळे नावाच्या क्रूरकर्मा पित्याला अटक केली आहे. तर श्रावणी असं त्या दुर्देवी बालिकेचं नाव आहे.


निलंगा तालुक्यातील निटूर येथील शिवाजी लाळे हा गेल्या काही वर्षापासून हॉटेल चालवूनउदरनिर्वाह करतो. त्याला दारूचं प्रचंड व्यसन आहे. त्याच्या व्यसनामुळे घरात कायमच भांडणं व्हायची. यात तो बायकोला कायम तो मारहाण करायचा. भांडणं सुरु झाल्यानंतर त्याची एक वर्षाची मुलगी रडत असल्याने संतापून शिवाजीने  चिमुरडीचा अक्षरशा गळा दाबून हत्या केली.

मुलीची आई मुक्ता लाळेने दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी लाळेच्या पहिल्या पत्नीने त्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यावेळी शिवाजीला तुरुंगात जावे लागले होते. जामिनावर सुटून आल्यानंतर त्याने मुक्ताशी दुसरं लग्न केलं होतं. त्याला हॉटेल व्यवसायातून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हतं. आर्थिक चणचण भासत असल्यामुळे तणावात असलेल्या शिवाजीने रागाच्या भरात सतत रडणाऱ्या श्रावणीची गळा घोटून हत्या केली.