- मुंबईत येत्या 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता, दुपारी पावणे दोन वाजता वर्षातील सर्वात मोठी हाय टाईड, लोकल सेवा 10 मिनिटं उशिराने
- वसई-विरारमध्ये पावसाचा जोर वाढला, सखल भागात पाणी, तर कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीतही मोठी वाढ
- ईव्हीएमविरोधात प्रमुख विरोधी पक्षांचा एल्गार, 21 ऑगस्टला रस्त्यावर उतरणार, तर ईव्हीएमविरोधात राग आळवणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर
- आगामी विधासभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपत युती होणारच, पण युती 50-50 च्या फॉर्म्युलावर आधारीत नसणार सूत्रांची माहिती
- औरंगाबादमध्ये सिझेरियनदरम्यान पोटात कापसाचा गोळा राहिल्यानं महिलेचा मृत्यू, 3 दिवसांच्या बाळाच्या डोक्यावरून मातृछत्र हरपलं, डॉक्टर निलंबित
- मुंबईत आता बेस्टच्या डेपोतही खाजगी वाहनांना पार्किंगची मुभा, पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यासाठी 27 ठिकाणी सोय, पहिले येणाऱ्यास प्राधान्य
- भारत आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर, 10 लाखांहून अधिक नोकऱ्यांवर गंडांतर येण्याची भीती, एबीपी माझाकडून रिअॅलिटी चेक
- काश्मीरमध्ये अमरनाथच्या मार्गादरम्यान स्नाईपर रायफल सापडल्यानं यात्रेला तूर्तास ब्रेक, कलम 35 ए रद्द करण्याच्या दृष्टीनं निर्णय घेतल्याचीही चर्चा
- भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान आज पहिला टी 20 सामना, वादानंतर विराट आणि रोहित पहिल्यांदाच मैदानावर एकत्र
- जगभरात मराठीचा झेंडा फडकवणाऱ्या मराठमोळ्या रत्नांचा गौरव, आज रात्री 8 वाजता माझा सन्मान सोहळ्याचं एबीपी माझावर प्रक्षेपण