नाशिक : मुंबईहून नाशिकला येणाऱ्या मार्गावर कसारा घाटात रस्ता खचल्यानं दुरुस्तीचं काम सुरु आहे. गेल्या चार पाच दिवसांपासून बंद असणारा कसारा घाट कमीतकमी पुढील दहा दिवस तरी बंद राहणार असल्याची माहिती आहे. कसारा घाटात रस्त्याला लांबच लांब आणि पाच फुट खोल भेगा पडल्या आहेत. या भेगा बुजवण्याचं तात्पुरत्या स्वरुपाचं काम करण्यात आला होता. मात्र त्याचा फारसा उपयोग होत नसल्यानं कायमस्वरूपी टिकेल असं काम करण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. यामुळे सध्या एकाच मार्गावरून दुहेरी वाहतूक केली जात असल्याने त्याचा वाहतुकीवर परिणाम होत आहे.


मुंबईहून नाशिकला येणाऱ्या मार्गावर कसारा घाटात रस्ता अतिशय धोकादायक पद्धतीने खचला आहे. घाटात रस्त्याला लांबच लांब भेगा पडल्या आहेत. या रस्त्याच्या खाली पाणी किती मुरले आहे तसेच दगड, माती, मुरूम कुठपर्यंत आहे याची पाहणी केली जात आहे. पाहणी केल्यानंतर त्या पद्धतीने पुढील कामाची रूपरेषा ठरवली जाणार आहे. त्यामुळे सध्या एकाच मार्गावरून दुहेरी वाहतूक केली जात आहे. यामुळे वाहतुकीवर परिणाम होत आहे. सध्या घाटात भर पावसात देखील काम सुरु आहे.