नाशिक : त्र्यंबकेश्वर जवळील बिल्वतीर्थ तलावात अल्टो कार बुडून बाप-लेकाचा मृत्यू झाला आहे.  आज (रविवार) संध्याकाळी 5.30 वाजता ही घटना घडली. वडील सुरेश भांगरे आणि मुलगा सूरज भांगरेंचा यात मृत्यू झाला.

अल्टो कारने दोन मुलांसह त्र्यंबकला फिरायला गेले असता वळणाच्या रस्त्यावर टर्न घेतांना कार तलावात कोसळली. कार चालवत असलेला मोठा मुलगा विशाल भांगरे यात सुदैवाने बचावला .

जवळपास 1 तासाच्या बचावकार्यानंतर गावकऱ्यांना कार बाहेर काढण्यात यश आलं.