नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, शेतकऱ्यांमध्ये फूट का पाडता? फुट पाडून काय मिळणार आहे? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
शेतकऱ्यांच्या 'मन की बात' समजून घ्या. विरोधी पक्षात असताना आम्ही ह्याच मागण्या करत होतो,म्हणून आम्हाला निवडून दिले हे विसरु नका, असंही राऊत म्हणाले.
"शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना ठाम आहे, पण भाजप ठाम असायला पाहिजे. आम्हाला राजकीय वळण दयायचं नाही, म्हणून आम्ही रस्त्यांवर उतरलो नाही. आम्ही सरकारच्या मानेवर बसलो आहोत", असं राऊत यांनी नमूद केलं.
मुख्यमंत्र्यांनी राजकीय इच्छाशक्ती दाखवायला हवी. त्यांनी मोदींच्या दारात जावून बसले पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः येतील, मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवायला हवी, आणि ठोस निर्णय घ्यायला हवा, असंही संजय राऊत म्हणाले.
संबंधित बातम्या
एबीपी ब्रेकिंग: कर्जमाफीसाठी सरकारच्या हालचाली सुरु
संप म्हणजे स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं: प्रकाश आंबेडकर
LIVE UPDATE : शेतकऱ्यांच्या संपाचा दुसरा दिवस