Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यामधील आजरा तालुक्यातील मेंढोलीत नानू जोतिबा कोकीतकर (वय 80) हे वयोवृद्ध शेतकरी ठार झाले. ते शेळी चारण्यासाठी गेले असता मधमाश्यांनी सहा शेळ्यांसह त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुलगे, एक विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.


मेंढोली येथील "काळवाट" नावाच्या शेतात शेळ्या चारण्यासाठी का गेले होते. नेहमीप्रमाणे आजऱ्याचा शुक्रवारी आठवडा बाजारादिवशी ते घरी न येता शेतातच थांबत होते. घरी न आल्याने त्यांची शोधाशोध सुरू झाली. ते शेतातील घरात मृतावस्थेत आढळून आले. सकाळपर्यंत त्यांच्या मृतदेहाशेजारी मधमाशा घोंगावत होत्या. वयोवृद्ध शेतकऱ्याचा मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने तसेच ऐन दिवाळीत असा प्रकार झाल्याने पंचकोशीत  हळहळ व्यक्त होत आहे.


कोकितकर यांचा एक मुलगा केंद्रीय राखीव पोलीस दलात असून दुसरा शेतकरी आहे. ऐन दिवाळीत कोकीतकर यांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. 


Kolhapur Crime : आजरा तालुक्यातील उत्तूरमध्ये चोरट्यांचा हवेत गोळीबार


दरम्यान, तालुक्यातील (Ajara Tehsil) उत्तूरमध्ये (Uttur Firing) दिनकर लहू कुंभार या सराफाला तीन चोरट्यांनी लुटण्याचा प्रयत्न गुरुवारी झाला होता. यावेळी नागरिक जमा झाल्याने एका चोरट्याने हवेत गोळीबार केला होता. यावेळी झालेल्या झटापटीत सुशांत आपके हा युवक व स्वतः कुंभार जखमी झाले. नागरिकांनी एका चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.


बॅग ठेवताच चोरून नेण्याचा प्रयत्न  


याचवेळी पल्सर मोटरसायकलवर थांबलेले अज्ञात तिघे चोरटे त्यांच्या दिशेने धावत आले व त्यांच्या हातातील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी झटापट होवून एका चोरट्याने चांदीचे दागिने असलेली बॅग हिसकावून घेतली. सोनं असलेली बॅग कुंभार यानी छातीशी घट्ट पकटून ठेवली. यावेळी चोरट्यांनी पिस्तुलच्या मागच्या बाजूने कुंभार यांच्या पाठीत मारले. कुंभार यांनी आरडाओरडा सुरु केल्याने नागरिक जमा झाले. 


सहकारी पकडताच इतर दोघांकडून हवेत गोळीबार करत पोबारा


यावेळी सुशांत आपके या युवकाने मोठ्या धाडसाने एका चोरट्याला पकडून ठेवले. यावेळी इतर दोघांनी सुशांतच्या डोक्यात मारहाण केली, यामध्ये तो गंभीर जखमी झाला. तोंडावर ठोसे मारल्याने एक दात पडला. यावेळी इतर युवक जमा होवून त्या चोरट्याला पकडून त्यांचे हातपाय बांधले. आपल्या सहकाऱ्याला पकडल्याचे लक्षात येताच इतर दोघांनी पोबारा केला. जाताना त्यांनी हवेत गोळीबार केल्याने भीतीचे वातावरण तयार झाले. 


इतर महत्वाच्या बातम्या