सांगली : कडकनाथ कोंबडी पालन व्यवसाय घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार आणि महा रयत ॲग्रो कंपनीचा संस्थापक सुधीर मोहिते आज न्यायालयात शरण आला आहे. मागील दोन महिन्यापासून मोहिते फरार होता. न्यायालयात शरण येताच पोलिसांनी त्याला अटक केली.
महाराष्ट्र बरोबरच कर्नाटक, तेलंगणा, केरळ, गोवा यासह हजारो शेतकऱ्यांना सुमारे 800 कोटींना महा रयत अँग्रो कंपनीने गंडा घातल्याची शक्यता आहे. याप्रकरणी दोन महिन्यांपूर्वी संस्थापक सुधीर मोहितेसह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला. यातील तिघांना यापूर्वी पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून मुख्य सुत्रधार सुधीर फरार होता. अटकपूर्व जामिनासाठी त्याने न्यायालयात अर्जही केला होता. या अर्जावर सुनावणी होण्याआधीच आज तो न्यायालयात शरण आला.
कडकनाथ कोंबडी व्यवसायात गुंतवणूक केलेल्या हजारो शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी महारयत अॅग्रो कंपनीचा संस्थापक सुधीर मोहितेसह सहा जणांच्या विरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात गन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी संदीप मोहिते, हणमंत जगदाळे, गणेश शेवाळे यांना आधीच अटक करण्यात आली होती.
या फसवणूक प्रकरणी आत्तापर्यंत 1100 जणांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यात कडकनाथ कुक्कुटपालनाची शक्कल लढवित गुंतवणुकीची योजना सुरू केली होती.‘रक्कम गुंतवा, पक्षी पाळा, अंडी व कोंबड्या विका’ असं या योजनेचे स्वरुप होतं. यात प्रोजेक्ट मालकास एकूण 75 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागायची. यातून शेतकर्याला एका वर्षात 2 लाख 30 हजार आणि 375 रुपयाप्रमाणे 120 पक्ष्यांच्या विक्रीतून 45 हजार असे पावणे तीन लाख देण्याचे आमिष दाखविले होते. 75 हजारांच्या बदल्यात वर्षभरात मोठा परतावा मिळत असल्याने तसेच दोन टप्प्पात रक्कम द्यायची असल्याने अनेक शेतकरी या योजनेला सहजासहजी बळी पडले आहेत. सुमारे 8 हजार शेतकर्यांचे सुमारे 300 ते 400 कोटी रुपये यात अडकले असल्याची माहिती आहे.
कडकनाथ कोंबडी घोटाळा, मुख्य सूत्रधार अखेर जेरबंद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Oct 2019 06:57 PM (IST)
या फसवणूक प्रकरणी आत्तापर्यंत 1100 जणांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -