मुंबई : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं काऊंडाउन सुरु झालं आहे. ‘एबीपी माझा’ही नेटीझन्सना अपडेट ठेवण्यासाठी सज्ज आहे. सकाळी आठ वाजल्यापासून पहिले कौल हाती येण्यास सुरुवात होईल.राज्यात 21 ऑक्टोबर रोजी मतदान झालं होतं. एक्झिट पोलच्या आकड्यांनुसार महाराष्ट्रात भाजपचं सरकार स्थापन होण्याचा अंदाज आहे. तर विरोधकांचा सुपडासाफ होऊ शकतो.


एबीपी माझावर सकाळी सहा वाजल्यापासून निकालाचं नॉनस्टॉप महाकव्हरेज सुरु होईल. टीव्हीशिवाय तुम्हाला प्रत्येक प्लॅटफॉर्मवर संपूर्ण माहिती मिळेल. तुम्ही ऑफिसमध्ये असाल किंवा प्रवासात, निकालाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमची आहे. टीव्हीसोबत वेबसाईट, फेसबुक, ट्विटरपासून अॅपवरील नोटिफिकेशनद्वारे एबीपी माझा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे.

तुमच्यापर्यंत सर्वात फास्ट निकाल पोहोचवण्यासाठी एबीपी माझानेही खास तयारी केली आहे. वेबसाईटसह सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरही एबीपी माझाची टीम तैनात असेल. एबीपी माझाच्या साईटवर महाराष्ट्रातील मतदारसंघांची टॅली, लाईव्ह टीवी, लाईव्ह अपडेट आणि ब्रेकिंग न्यूजद्वारे कोणता पक्ष आघाडीवर कोणता पिछाडीवर याची माहिती मिळेल.

व्हीआयपी उमेदवारांची परिस्थिती
याशिवाय तुम्ही राज्यातील व्हीआयपी उमेदवारांची परिस्थितीही वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे. तुम्ही केवळ स्वत:च्याच नाही तर राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघाचे लाईव्ह अपडेट वाचू शकता. प्रत्येक मतदारसंघाशी संबंधित प्रत्येक लहानमोठी माहिती तुम्हाला मिळेल.

तुम्ही टीव्ही आणि वेबसाईटशिवाय मोबाईल फोन आणि इतर तमाम प्लॅटफॉर्मवर निकालांचे लाईव्ह अपडेट्स पाहू शकता.

तुमच्या अँड्रॉईड किंवा आयओएस स्मार्टफोनमध्ये ABP Live अॅप इन्स्टॉल करुन लाईव्ह टीव्ही पाहू शकता. तुमच्याकडे अॅप असेल तर नोटिफिकेशनद्वारेही निकाल मिळतील.

एका क्लिकवर विधानसभा मतदारसंघाची माहिती
एबीपी माझाच्या वेबसाईटवर तुम्हाला विधानसभा मतदारसंघांचा निकाल पाहू शकता. सोबतच 2014 च्या विधानसभा निवडणुकीत तुमच्या मतदारसंघात कोणाचा विजय झाला होता, कोण पराभूत झालं होतं. दोन्ही पक्षांमध्ये किती मतांचं अंतर होतं. तसंच मतदारसंघात किती मतदार आहेत, त्यापैकी पुरुष किती आणि महिला किती याची माहितीही मिळणार आहे.