जालना : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव आमदार संतोष दानवे यांची शिवार संवाद यात्रे दरम्यान होणारी सभा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावली.


जालना तालुक्यातील रेवगाव येथे संतोष दानवेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. सुरुवातीला स्वागताचा कार्यक्रम पार पडल्यानंतर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी सुरु केली.

स्टेजचा ताबा घेत अगोदर आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या, बाकीचं काही बोलू नका म्हणून तगादा लावला आणि घोषणाबाजी करत सभा उधळून लावली. यावेळी महिला कार्यकर्त्यांचा देखील यात सहभाग होता.

परिस्थिती जास्त भडकण्याची शक्यता असल्याने आमदार संतोष दानवे यांनी गावातून काढता पाय घेत सभास्थळ रिकाम केलं.