धुळे : बियाणे खरेदीसाठी पैसे नसल्याने, आर्थिक विवंचनेत सापडलेल्या भाऊसाहेब फकिरा ठाकरे या 46 वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केली.


 

भाऊसाहेब आज सोमवारी सकाळी 9 ते 11 वाजेच्यादरम्यान नामपूर येथे बियाणं खरेदीला जात असल्याचं सांगून घराबाहेर निघाले. त्यांनी नामपूर येथे काही बियाणं विक्रेत्यांकडे उधारीवर बियाणं देण्याची मागणी केली. मात्र, त्यांची ही मागणी बियाणं विक्रेत्यांनी धुडकावून लावली, त्यामुळे हताश झालेल्या भाऊसाहेबांनी विष प्राशन करून आत्महत्या केली.

 

भाऊसाहेबांचे 1 हेक्टर 80 एकर शेतजमीन आहे. गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळीस्थितीमुळे शेतातील विहरीला पाणी नाही, 50 पैसे पेक्षा कमी आणेवारी जाहीर झालेली असतांनादेखील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना शासकीय मदत पोहचलीच नाही. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने स्वतःची दोन्ही मुलं परराज्यात रोजगारासाठी पाठली.

 

यंदा भरपूर पाऊस होणार, या हवामान विभागाच्या अंदाजाने भाऊसाहेब फकिरा पाटील यांचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला, मात्र बियाणं खरेदीसाठी पैसा नसल्याने हताश झालेल्या भाऊसाहेबांनी आपली जीवन यात्रा संपवली.