खाजगी सावकार आणि पतसंस्था यांच्याकडील कर्जामुळे आत्महत्या केल्याचा आरोप घोगरे यांच्या नातेवाईकांनी केला आहे. दत्तात्रय घोगरे यांची राजुरी गावात 1 एकर शेती आहे. मात्र दत्तात्रय घोगरे हे गेल्या काही वर्षांपासून उस्मानाबाद शहरात वास्तव्याला होते. मुलांचा शिक्षणाचा खर्च आणि शेतातील अल्प उत्पनामुळे आर्थिक ओढाताण सुरु असल्याच्या नैराश्यातून दत्तात्रय घोगरे यांनी आत्महत्या केली आहे.
दत्तात्रय घोगरे यांची एक मुलगी आणि एक मुलगा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहेत. दरम्यान कर्जबाजारीपणाला कंटाळून साताऱ्यातील दोन भावांनी काल सोमवारी रात्री आत्महत्या केली आहे.
संबंधित बातम्या :
कर्जाला कंटाळून दोन सख्ख्या शेतकरी भावांची आत्महत्या
देशाचा पोशिंदा ऐतिहासिक आंदोलनाच्या तयारीत!
पहिल्यांदाच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा संपाचा इशारा
VIDEO: कोल्हापूर : शेतकरी संपावर जातोय म्हणजे देशाची अराजकाकडे वाटचाल : राजू शेट्टी