साईचरणी सोन्याच्या मुकुटाचं दान
रामनवमीनिमित्त साईचरणी 12 किलो सोन्याचं दान!
एबीपी माझा वेब टीम | 04 Apr 2017 05:06 PM (IST)
शिर्डी : रामनवमीच्या मुहूर्तावर साईबाबांच्या चरणी एका भक्तानं 12 किलो सोन्याचं दान दिलं आहे. हैदराबादमधील एका साईभक्तानं हे सोनं साईचरणी अर्पण केलं आहे. शिर्डी साईबाबा संस्थानला दान देण्यात आलेल्या सोन्याची किंमत जवळपास सव्वातीन कोटी रुपये आहे. या 12 किलो सोन्याच्या समाधीला महिरप लावण्यासाठी उपयोग केला जाणार आहे. तसंच समाधीच्या कठड्याला सोन्याचं आवरण चढवलं जाणार आहे. साईबाबांच्या चरणी नेहमीच भक्त अनेक मौल्यवान वस्तु दान देत असतात. आतापर्यंत हिरेजडित मुकूट, महिंद्रा एक्सयुव्ही 500, अर्धा किलो सोन्याचा मुकूट, रत्नजडित हार, 32 किलो चांदीचा चौरंग अशा अनेक मौल्यवान वस्तू साईचरणी दान देण्यात आल्या आहेत. संबंधित बातम्या :