कल्याण : पावसाळ्यात माथेरानला ट्रेकिंगसाठी गेलेल्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. डोंबिवलीतील हर्षद भोळेचा अपघाती मृत्यू झाला.

 
डोंबिवलीत राहणारा 16 वर्षांचा हर्षद भोळे हा विद्यार्थी दरवर्षी पावसाळ्यात मित्रांसोबत ट्रेकला जायचा. शनिवारीही हर्षद भाऊ प्रणय आणि मित्रांसोबत माथेरानला पेबच्या किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेला होता. त्यावेळी डोक्यात दगड पडून हर्षदचा मृत्यू झाला.

 
हर्षदचा भाऊ प्रणयही यावेळी त्याच्यासोबत होता. स्थानिकांच्या मदतीने हर्षदला नेरळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पोलिसांना फोन करुनही ते दोन तास उशिरा आल्याचं प्रणयने म्हटलं आहे.

 
हर्षद मुलुंडच्या केळकर महाविद्यालयात बारावी कला शाखेत शिकत होता. त्याच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबीयांसोबत मित्र परिवार शोकसागरात बुडाला आहे.