LIVE: कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प
एबीपी माझा वेब टीम | 27 Jun 2016 02:08 AM (IST)
हेडलाईन्स: 1. पम्पोरमधील दहशतवादी हल्ल्याचा व्हिडिओ समोर, जवानांच्या गाडीसमोर उभं राहून दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या, स्थानिकानं केलं मोबाईल शूट ----------------------------------- 2. मुंबईत मध्यरात्रीपासून पावसाची थोडीशी विश्रांती, मात्र पुढचे 24 तास मुसळधार कोसळण्याचा अंदाज ----------------------------------- 3. शेलारांनी केलेल्या जाळपोळीच्या वक्तव्यावर शिवसेना आक्रमक, सामनातून टीकेचे बाण, अंगावर आलात तर शिंगावर घेण्याची सेनेची भाषा ----------------------------------- 4. वायकरांनी जोगेश्वरी गुफा परिसरात एसआरएचं कंत्राट बिल्डरला दिलं, निरुपम यांचा नवा आरोप, आरोपांच्या फैरींमध्ये तथ्य नसल्याचा वायकरांचा दावा ----------------------------------- 5. फडणवीसांनी छत्रपतींना खासदारकी देण्याची ही पहिलीच वेळ, शरद पवारांच्या टिपण्णीनं आश्चर्य, तर मुख्यमंत्र्यांकडून मात्र पवारांना संयमी उत्तर ----------------------------------- 6. 30 सप्टेंबरपर्यंत अघोषित मालमत्ता जाहीर करा, मन की बातमधून मोदींची तंबी, स्वतःहून माहिती देणाऱ्यांवर कारवाई न करण्याचं आश्वासन ----------------------------------- 7. सत्कारानंतर महिलेनं सिद्धरामैयांचं चुंबन घेतलं, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या किसचा व्हीडिओ व्हायरल, बंगुळुरूच्या कार्यक्रमातील घटना ----------------------------------- 8. तेलगु चाहत्यांकडून सैराट टीमचा सत्कार, हैदराबादमध्ये स्पेशल शोचं आयोजन, झिंगझिंग झिंगाटच्या तालावर थिरकलं हैदराबाद