अमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच माजी मुख्यमंत्री होतील, अशी बोचरी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. अमरावतीमध्ये ते बोलत होते.

पक्षात घेतलेले हे माजी गुंड आहेत, असं विधान मुख्यमंत्र्यांनी 'माझा कट्टा'वर बोलताना केलं होतं. त्यावर संजय राऊतांनी तिखट टीका केली आहे. मात्र संजय राऊतांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय.

मुख्यमंत्र्यांनी गुंडांना क्लीन चिट देण्याचा कारखाना उघडला आहे, असंही ते म्हणाले. तर सरकारचा अंत जवळ आला आहे , 23 फेब्रुवारीनंतर राज्याची परिस्थिती पूर्णपणे बदललेली असेल, असं भाकीतही संजय राऊत यांनी केलं.

दरम्यान 'सामना'च्या बंदीवरुन संजय राऊतांनी भाजपवर जोरदार टीका केली. 'सामना'वर बंदीची मागणी म्हणजे आगीशी खेळणं आहे, असं ते म्हणाले.

शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’ 16, 20 आणि 21 फेब्रुवारीला छापला जाऊ नये, अशी मागणी भाजपने निवडणूक आयोगाकडे केली होती.

संबंधित बातम्या :


... तर मग मुख्यमंत्री, पंतप्रधानांच्या तोंडालाही बूच मारा : उद्धव ठाकरे


चक्रव्यूह भेदून बाहेर पडेन! विजय आमचाच : मुख्यमंत्री


सेना मंत्र्यांना लाल दिव्याची सवय, सत्ता सोडणार नाहीत: पृथ्वीराज चव्हाण


निवडणुकीनंतरही सरकारला कोणताही धोका नाही : चंद्रकांत पाटील