मुंबई : पालघरच्या सातवली गावात एटीएसनं जप्त केलेली स्फोटकं ही आरडीएक्स असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. त्यामुळे साहजिकच पुन्हा एकदा मुंबई रक्तरंजित करण्याची योजना आखली गेली होती का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

एफएसएलच्या अहवालानुसार त्या स्फोटकांची पाहणी केली गेली. त्यात ती स्फोटकं ही आरडीएक्स असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे आता एटीएसही चकित झाली आहे.

27 ऑक्टोबरला मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील सातवलीमध्ये एका झोपडीत जिलेटीनच्या कांड्या आणि ज्वलनशील पदार्थ सापडले होते. मुंबई आणि ठाणे एटीएसने संयुक्त कारवाई करत हा डाव उधळून लावला होता.

ऐन दिवाळीच्या तोंडावर 15 ते 20 किलो स्फोटकं सापडल्याने भीती व्यक्त केली जात होती. पालघरचा बराचसा भाग हा समुद्राला जोडलेला असल्यानं हा परिसर संवेदनशील समजला जातो.

संबंधित बातम्या :


पालघरमध्ये स्फोटकांचा साठा जप्त, एटीएसची कारवाई