Rohit Pawar : हाय होल्टेज बारामती लोकसभेच्या निवडणुकीत पहाटेपर्यंत बँक उघडी ठेवणारे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वेल्हा शाखेचे (PDCC Bank) व्यवस्थापक तलवडे यांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र, ही झालेली कारवाई धुळफेक असल्याची टीका करत आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे.
रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, PDCC बँकेच्या वेल्हा शाखेतील मॅनेजरवर झालेली निलंबनाची कारवाई ही धूळफेक आहे.. मध्यरात्री त्या शाखेत कोण कोण होते, कशासाठी होते, कुणाच्या सांगण्यावरून होते आणि काय व्यवहार झाले या सर्व गोष्टींची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होऊन कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. तसंच त्या रात्रीचं #CCTV फुटेज सार्वजनिक झालं पाहिजे. बारामती मतदारसंघातील निवडणुकीत गैरप्रकार करण्यासाठी या बँकेतून पैसा गेल्याचा आमचा आरोप असून तसे अनेक व्हिडिओ मी उघड केले आहेत. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यावी.
बारामती निवडणुकीवरून आरोपांच्या फैरी
दरम्यान, पहाटेपर्यंत बँक शाखा सुरु ठेवण्यात आल्याने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वेल्हा शाखेचे व्यवस्थापक विनायक ज्ञानोबा तेलवडे यांना निलंबित करण्यात आलं असून निवडणूक आयोगाच्या आदेशावरून (Election Commission) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातील सर्वाधिक हाय होल्टेज असलेल्या बारामती लोकसभेच्या निवडणुकीत दिवसभर पैसे वाटपाचे आरोप झाले होते. आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत अजित पवार गटावर आरोप केले होते. अजित पवार गटाकडूनही आरोप करण्यात आले. पीडीसीसी बँकेची वेल्हा शाखा पहाटपर्यंत सुरु असल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने निलंबनाची कारवाई केली होती. रोहित पवारांनी मतदानादिवशी ट्विटवर ट्विट करत व्हिडिओ पोस्ट केले होते. एका व्हिडीओत वेल्हेमध्ये पीडीसीसी बँक रात्रीच्या सुमारास सुरु असलेली दिसत होती. बँक रात्री 1 वाजताही का सुरु ठेवली? असा सवाल रोहित पवारांनी विचारला होता. बँकेतून पैसे वाटप केल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
इतर महत्वाच्या बातम्या