मुंबई: चक्रीवादळानंतर तडाख्याने उद्ध्वस्त कोकणवासियांना केंद्रीय पथकाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. 3 जूनच्या निसर्ग चक्रीवादळानंतर हळूहळू कोकण उभं राहतंय. राज्य सरकारनं कोकणवासियांना तातडीनं मदत करून मोठा दिलासा दिला आहे पण ही मदत तोकडी असून आणखी मदतीची गरज आहे. या वादळानं घातलेल्या थैमानानंतर काल केंद्रातलं एक पथक कोकणात दाखल झालं आहे. या पथकानं काल अलिबाग, चौल, श्रीवर्धन परिसराची पाहणी केली. आज हे हे पथक महाडहून रत्नागिरीकडे प्रयाण करून दिवसभर तिथल्या नुकसानीची पाहणी करणार आहे. या वादळात अनेक लोकांची उद्ध्वस्त घरं, शाळा आणि बागांचं नुकसान झालं आहे. या दौऱ्याआधी रायगड पालकमंत्री आदिती तटकरे यांनी या केंद्रीय पथकाची भेट घेतली होती.


प्रत्यक्ष नुकसान, प्रत्येक झाडाची भरपाई आणि एनडीआरएफची निकष बदलण्याची केली मागणी. या नुकसानीबाबत प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीची आणि झालेल्या नुकसानीची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केंद्रीय पथकाला दिली. या केंद्रीय पथकाचं नेतृत्व रमेशकुमार गंटा (भाप्रसे) यांनी केलं त्यांच्यासह अर्थ, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम  कृषी खात्याचे अधिकारी उपस्थित होते

जिल्हाधिकाऱ्यांना काय वाटतंय?

चक्रीवादळामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीबाबतची संख्यात्मक माहिती देताना छोट्या छोट्या गोष्टींचीही बारकाईने नोंद घेण्यात यावी. कृषी विभाग,मत्स्य विभाग, महसूल विभाग, महावितरण या संबंधित सर्व विभागांच्या क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी जनतेच्या झालेल्या नुकसानीची बारकाईने नोंद घेऊन त्याप्रमाणे अहवाल तयार करावा, या अहवालाचा अभ्यास करावा व लोकांना मदत करावी असं निधी चौधरी यांनी मत व्यक्त केलं आहे,

'आमचं ऐका आणि पुढे जा' ग्रामस्थांची पथकाला विनंती

केंद्रीय पथक पाहणी करत असताना दोन अनिश्चित ठिकाणी पथकाला थांबवं लागलं. गेल्या अनेक दिवसांपासून लाईट, रेशन नसल्यानं या स्थानिकांना आपली व्यथा पथकासमोर मांडायची होती. त्याप्रमाणे ग्रामस्थांनी आपल्या मागण्या पथकसमोर ठेवल्या. कोकणातील लोकांना मदत मिळतेय पण ती कमी स्वरूपात असल्याची भावना व्यक्त केली जातंय दुसरीकडे विरोधी पक्षानं कोकणाचा दौरा केल्यानं लोकांच्या मनात आणखी अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे राज्य तसेच केंद्र सरकारवरचा दबाव वाढत चाललाय

कालचा दौरा कसा होता?

सकाळी 10 वाजता हे पथक मांडवा जेट्टीवर दाखल झालं. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी त्याचं स्वागत केलं. केंद्र सरकारने नेमलेल्या या पथकाचे प्रमुख रमेश कुमार गांटा (आयएएस) हे आहेत. त्याचबरोबर त्यांच्या पथकामध्ये बी.के. कौल (संचालक, अर्थमंत्रालय, नवी दिल्ली), एन.आर.एल.के. प्रसाद (संचालक, ऊर्जा मंत्रालय, नवी दिल्ली), एस.एस. मोदी (उपसचिव, ग्रामीण विकास, मंत्रालय, नवी दिल्ली), आर.पी. सिंग (संचालक, कृषी मंत्रालय, नागपूर) आणि अंशुमाली श्रीवास्तव (मुख्य अभियंता, रस्ते वाहतूक, महामार्ग, मुंबई) यांचा समावेश आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात डिजीटल आढावा घेण्यात आला त्यानंतर अलिबाग-चौल, मुरूड, श्रीवर्धनचा दौरा करण्यात आला. त्यानंतर आज हे जूनला महाडहून रत्नागिरीकडे प्रयाण करून दिवसभर तेथील नुकसानीची पाहणी करणार आहेत