Exit Poll 2024 LIVE Updates : देशातील 543 जागांचा एबीपी सी वोटरचा एक्झिट पोल, भाजपला पुन्हा स्वबळावर सत्ता मिळण्याचा अंदाज

Lok Sabha Election Exit Poll 2024 LIVE Updates : सर्वात जलद आणि सर्वात अचूक एक्झिट पोल एबीपी माझावर. राज्यनिहाय एक्झिट पोल संबंधित प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर.

जयदीप मेढे Last Updated: 01 Jun 2024 08:57 PM
Exit Poll 2024 LIVE Updates : महाराष्ट्रात महायुती 45 प्लसचा आकडा गाठणार : अनुप धोत्रे

 राज्यात भाजप आणि महायुती 45 प्लसचा आकडा गाठणार असा अंदाज भाजपचे अकोल्याचे उमेदवार अभय पाटील यांनी वर्तवला.

Exit Poll 2024 LIVE Updates : उत्तर भारतात पुन्हा कमळ फुलणार, उत्तर प्रदेशात भाजपला 62 ते 66 जागांचा अंदाज

Exit Poll 2024 LIVE Updates : उत्तर भारतात पुन्हा कमळ फुलण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात भाजपला 62 ते 66 जागांचा अंदाज आहे. 80 पैकी 62 ते 66 जागा भाजपला मिळतील. बिहारमध्ये एनडीएला 34 ते 38 जागा मिळतील, असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.

Exit Poll 2024 Live Updates : महाराष्ट्रात महायुतीला 40 पेक्षा अधिक जागा मिळणार : अतुल भातखळकर

महाराष्ट्राची जनता महायुतीचं काम पाहते,  नरेंद्र मोदींनी केलेलं काम पाहते, महायुतीला 40 पेक्षा अधिक जागा मिळतील, असा दावा अतुल भातखळकर यांनी केला. 

Lok Sabha Election 2024 ABP C voter Exit poll: राजस्थानमध्ये भाजपलाच पुन्हा संधी 

राजस्थानमध्ये भाजपला पुन्हा एकदा मतदारांचा कौल मिळताना पाहायला मिळतो. भाजपला राजस्थानमध्ये 21-23 जागा मिळू शकतात.

Lok Sabha Election 2024 ABP C voter Exit poll: गुजरातमध्ये भाजपचा जलवा कायम 

गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपला वर्चस्व मिळू शकतं. भाजपला गुजरातमध्ये 25-26 जागा मिळतील, असा अंदाज एबीपी सी वोटरच्या एक्झिट पोलमध्ये समोर आला आहे.

Exit Poll 2024 LIVE Updates : महायुतीला 32 ते 35 जागा मिळू शकतात : रुपाली ठोंबरे पाटील

 Exit Poll 2024 LIVE Updates : महाराष्ट्रात महायुतीत लोकसभा निवडणुकीत 32 ते 35 जागा मिळू शकतात, असा अंदाज रुपाली पाटील ठोंबरे यांनी वर्तवला आहे.

Lok Sabha Election Exit Poll : महाराष्ट्रात एक्झिट पोलनुसार भाजपचं सर्वात मोठा पक्ष

लोकसभा निवडणुकीत एबीपी सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार भाजप सर्वात मोठा पक्ष राहू शकतो. भाजपला 17 जागा मिळू शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

Exit Poll 2024 Live Updates : मी माझं काम केलं विजय झाला तर माजायायचा नाही आणि पराभव झाला तर लाजायचं नाही : सुधीर मुनगंटीवार

मी माझं काम केलं विजय झाला तर माजायायचा नाही आणि पराभव झाला तर लाजायचं नाही... मला मत द्यायचं की नाही याचा संपूर्ण अधिकार जनतेचा आहे...मी काँग्रेस सारखे खोटे आश्वासन कधी देणार नाही. जनतेने काँग्रेसला निवडून दिल्याने त्यांचं भलं होणार असेल तर अस जनतेला वाटत असेल, तर ठीक आहे. पण  मी निवडून आलो तर जीव तोडून काम केल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसला निवडून दिल्याने जर जनतेचे प्रश्न सुटत असेल असं जनतेला वाटत असेल पाच वर्ष मी निश्चिंत राहील, असं सुधीर मुनंगटीवार यांनी म्हटलं. 

Exit Poll 2024 Live Updates : महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 35 ते 40 जागा मिळणार : नाना पटोले

 महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 35 ते 40 जागा मिळणार, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात धक्कादायक निकाल?

मुंबई: देशातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया शनिवार संपुष्टात आली. आज देशात सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडले. यानंतर सर्वांना उत्सुकता असलेले एक्झिट पोलचे (Exit Poll 2024) निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये टीव्ही 9- पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सरशी होण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा

Exit Poll 2024 LIVE Updates : मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरातमध्ये भाजप आघाडीवर राहणार

 Exit Poll 2024 LIVE Updates :  मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरातमध्ये भाजप आघाडीवर राहणार असल्याचा अंदाज एबीपी सी व्होटरच्या एक्झिट पोलमध्ये समोर आला आहे. 

Exit Poll 2024 LIVE Updates : महायुतीला एक्झिट पोलच्या अंदाजापेक्षा अधिक जागा मिळणार : मनीषा कायंदे

लोकसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला अधिक जागा मिळतील, असं मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे. 

Exit Poll 2024 LIVE Updates : महायुती आणि महाविकास आघाडीला महाराष्ट्रात किती जागा मिळणार? जाणून घ्या एबीपी सी वोटरचा एक्झिट पोल

महायुती आणि महाविकास आघाडीला महाराष्ट्रात किती जागा मिळणार? जाणून घ्या एबीपी सी वोटरचा एक्झिट पोल





Exit Poll 2024 LIVE Updates : भाजप महायुतीला 42 जागा मिळणार : आशिष शेलार

लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुती 42  जागा जिंकतील असे मला वाटते. पण मी आज कोणत्याही एक्झिट पोल वर बोलणार नाही, असं आशिष शेलार यांनी म्हटलं. 

Exit Poll 2024 Live : आम्हाला 18 पेक्षा अधिक जागा मिळणार : किशोरी पेडणेकर

लोकसभा निवडणुकीत आम्हाला 18 पेक्षा अधिक जागा मिळतील, असा अंदाज किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला. गावागावात मशाल पोहोचली असून मविआला 33 ते 35  जागा मिळतील, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. 

Exit Poll 2024 LIVE Updates : आम्हाला एक जरी जागा दिली तरी नाराज नाही : रुपाली ठोंबरे पाटील

Exit Poll 2024 LIVE Updates :  आम्हाला एक जरी जागा दिली तरी नाराज आम्ही नाही, असं रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या. 4  जूनला आमचे उमेदवार विजयी झालेले दिसतील, असं रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या. 

महाराष्ट्रात कुणाला किती जागा मिळणार? मविआ आणि महायुतीला किती जागा मिळणार?

  • एबीपी माझा-सी वोटरच्या एक्झिट पोलमध्ये दिसली रस्सीखेच

  • महायुती व मविआला निम्म्या निम्म्या जागांचा अंदाज

  • महायुतीला 24 तर मविआला 23 जागांचा अंदाज

  • भाजप 17, तर शिंदे गटाला 6 जागांचा अंदाज

  • अजित पवार गटाला फक्त एक जागेवर विजय शक्य

  • मविआमध्ये काँग्रेसला 8, ठाकरे गटाला 9 जागांचा अंदाज

  • शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 6 आणि इतरांना 1 जागा मिळू शकते

Exit Poll 2024 Live Updates : एबीपी सी वोटरनुसार ईशान्य भारतात एनडीएचं वर्चस्व

ईशान्य भारतात एनडीएचं वर्चस्व


एनडीए  : 6-9
इंडिया आघाडी : 1-3

Assam Exit Poll Live Update : एक्झिट पोलमध्ये आसाम भाजपकडे जाणार, एबीपी सी वोटरचा अंदाज

आसामममध्ये भाजपला 14 पैकी 12 जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला 2  जागा मिळू शकतात असा अंदाज एबीपी सी वोटरच्या एक्झिट पोलमध्ये समोर आला आहे. 

ABP Cvoter Exit Poll Results 2024 Maharashtra : महाविकास आघाडी भरारी घेणार, राज्यात 23 ते 25 जागा जिंकण्याचा अंदाज!

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : गेल्या निवडणुकीमध्ये भाजप प्रणित युतीला 42 जागा मिळाल्या होत्या. यंदा मात्र त्यांना 16 ते 20 जागांचा फटका बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सविस्तर वाचा

Lok Sabha Exit Poll 2024: महाराष्ट्रात मविआ 23, महायुती 24, ठाकरेंना 9, अजित पवारांना एका जागेचा अंदाज

महाराष्ट्रात मविआ 23, महायुती 24, ठाकरेंना 9, अजित पवारांना एका जागेचा अंदाज. गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला महाराष्ट्रात 41 जागांवर विजय मिळाला होता. मात्र, आता आकडा 26 जागांपर्यंत खाली आल्यास हा भाजपप्रणित NDA आघाडीसाठी मोठा धक्का ठरेल. सविस्तर वाचा

Exit Poll Live Update : केरळ, तामिळनाडूत इंडिया आघाडीचं वर्चस्व, कर्नाटक, तेलंगणा आंध्रात एनडीएचं वर्चस्व

Exit Poll Live Update : केरळ, तामिळनाडूत इंडिया आघाडीचं वर्चस्व असेल तर कर्नाटक, तेलंगणा आंध्रात एनडीएचं वर्चस्व राहणार असल्याचा अंदाज एबीपी सी-व्होटरच्या एक्झिट पोलमध्ये समोर आला आहे. 

Marathwada Exit Poll Results 2024 : मराठवाड्यात कोण बाजी मारणार?

Exit Poll Results 2024: मराठवाड्यात नेमकं कोण बाजी मारणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. कारण छत्रपती संभाजीनगर, धाराशीव, हिंगोली, नांदेड, जालना, बीड या जागा लोकसभा निवडणुकीत चर्चेत होत्या. इथे क्लिक करुन जाणून घ्या.

Exit Poll 2024 Live Updates: 44 दिवसांच्या मतदानाच्या अभ्यासात एक्झिट पोलच्या निकालासाठी सर्व तयारी झाली आहे

Exit Poll 2024 Live Updates : 2024 लोकसभा निवडणुकीसाठी बहुप्रतीक्षित एक्झिट पोलचे निकाल आज संध्याकाळी 6.00 वाजल्यापासून अंतिम टप्प्यात मतदान संपल्यानंतर जाहीर होतील.

Maharahtra Exit Poll 2024 : महाराष्ट्रातल्या सर्वच्या सर्व ४८ जागांवरचा कल काय आहे.

लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानाचा शेवटचा टप्पा आज संपतोय.. त्यामुळं सगळ्या देशाचं लक्ष आता ४ जूनकडे लागलंय.. देशात कुणाची सत्ता येणार? आणि कोणाला पराभवाची धूळ चाखावी लागणार याची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली आहे.
महाराष्ट्रात नेमकं काय होणार, शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन मोठ्या प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर होणारी ही सगळ्यात मोठी सार्वत्रिक निवडणूक आहे. त्यामुळे महाराष्ट्र हे प्रेडिक्ट करण्यासाठी सगळ्यात कठीण राज्य दाखवलं जातंय. 
महाराष्ट्रातल्या या राजकीय बदलांचा नेमका काय परिणाम झाला हे ४ जूनला स्पष्ट होणार आहेच. 
पण
त्याआधीच आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.. निकालाआधीचा महानिकाल... सगळ्यात अचूक आणि वेगवान एक्झिट पोल तुम्ही एबीपी माझावर पाहणार आहात...
महाराष्ट्रातल्या सर्वच्या सर्व ४८ जागांवरचा कल काय आहे.

Lok Sabha Election Exit Poll Live : महाविकास आघाडीला 30-35 जागा मिळणार : अनिल देसाई 

महाविकास आघाडीला 30-35 जागा मिळणार : अनिल देसाई 





Lok Sabha Election Exit Poll : लोकसभा निवडणुकीसाठीचं सातव्या टप्प्यातील मतदान थोड्याच वेळात संपणार

लोकसभा निवडणुकीसाठीचं सातव्या टप्प्यातील मतदान थोड्याच वेळात संपणार आहे. लोकसभा निवडणुकीचं मतदान निवडणूक आयोगानं सात टप्प्यांमध्ये घेतलं होतं. 

Western Maharashtra Exit Poll Live : पश्चिम महाराष्ट्रात कोण बाजी मारणार? पुण्याच्या पत्रकारांचा माझा अंदाज

Western Maharashtra Exit Poll Live : पश्चिम महाराष्ट्रात कोण बाजी मारणार? पुण्याच्या पत्रकारांचा माझा अंदाज


पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये 10 जागांवर कोण आघाडीवर राहु शकतं याबाबत पुण्यातील पत्रकारांनी अंदाज वर्तवला. महाविकास आघाडीला पश्चिम महाराष्ट्रात यश मिळू शकतं, असा अंदाज पुण्यातील पत्रकारांनी वर्तवला. पश्चिम महाराष्ट्रात मविआला 6-7 ते महायुतीला 3-4 जागा मिळू शकतात.  

Maharashtra Lok Sabha Election Exit Poll Live : महाराष्ट्रातील मतदारांचा कौल कुणाला? महाविकास आघाडी की महायुती?

Maharashtra Lok Sabha Election Exit Poll Live : महाराष्ट्रात लोकसभेचे 48 मतदारसंघ आहेत. त्यामुळं महाराष्ट्राचा कौल लोकसभेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. महाराष्ट्रात महविकास आघाडीला की महायुतीला यश मिळणार याचा प्राथमिक अंदाज एक्झिट पोलमधून येऊ शकतो. 

Exit Poll Result : मराठवाड्यातील जागांवर कोण बाजी मारणार, स्थानिक पत्रकारांना काय वाटतं?

लोकसभा निवडणुकीत मराठवाड्याचा निकाल काय असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मराठवाड्याच्या संभाव्य निकालाबाबत तेथील पत्रकारांनी अंदाज व्यक्त केले आहेत. 


Lok Sabha Election 2024 Phase Seven : देशात तीन वाजेपर्यंत 49.68  टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात दुपारी तीन वाजेपर्यंत 49.68  टक्के मतदान झाले आहे. या टप्प्यात एकूण 57 जागांवर मतदान होत आहे. 

Lok Sabha Election 2024 Phase 7 : मतदानामध्ये हिमाचल प्रदेश आघाडीवर, आतापर्यंत सर्वाधिक कमी मतदान बिहारमध्ये

देशात सातव्या टप्प्यातील मतदान संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. दुपारी एक वाजेपर्यंत देशात सरासरी 40 टक्के मतदान झाले आहे. 


दुपारपर्यंत राज्यनिहाय मदतानाची टक्केवारी



  • बिहार - 35.65%

  • चंडीगड - 40.14%

  • हिमाचल प्रदेश - 48.63%

  • झारखंड - 46.80%

  • ओडिशा - 37.64%

  • पंजाब - 37.80%

  • यूपी - 39.31%

  • पश्चिम बंगाल - 45.07%

Lok Sabha Election Vote Turnout : देशात दुपारपर्यंत सरासरी 40 टक्के मतदान

निवडणूक आयोगाने एकूण 57 जागांवर आतापर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी जाहीर केली आहे. दुपारी एख वाजेपर्यंत सर्व जागांवर सरासरी 40.09 टक्के मतदान झाले आहे. 

RJD Leader Tejashwi Yadav Cast Vote In Bihar : तेजस्वी यादव यांनी बजावला मतदानाचा अधिकार

बिहारमध्ये राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे.





Exit Poll 2024 Live Updates: भाजप विरुद्ध इंडिया आघाडी, लोकांचा मूड काय? लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या अंदाजाकडे सर्वांचं लागलं लक्ष

एक्झिट पोल 2024 लाइव्ह अपडेट्स: भाजप आणि एनडीए '400 पार'चे ध्येय साध्य करेल?, की विरोधी पक्ष इंडिया आघाडी दमदार पुनरागमन करेल?


लोकसभा निवडणुकीत कोणता उमेदवार विजयी होणार आणि देशाचा मूड काय आहे, हे जाणून घेण्यासाठी एक्झिट पोल 2024 लाईव्ह ब्लॉग पाहत राहा

Exit Poll 2024 Live Updates: एक्झिट पोल म्हणजे काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होत आहे. मतदानाची वेळ संपल्यानंतर लगेच वेगवेगळ्या संस्था एक्झिट पोलच्या माध्यमातून या निवडणुकीचा संभाव्य निकाल व्यक्त करतील. कोण कोणत्या जागेवरून जिंकणार? किती मतांच्या फरकाने जिंकणार? याबाबतचे अंदाज या एक्झिट पोलमध्ये सांगितले जातील. 


मतदान झाल्यांतर वेगवेगळ्या संस्थांनी देशभरात सर्वेक्षण केलेले आहे. याच सर्वेक्षणाच्या आधारे हे एक्झिट पोलचे आकडे सांगितले जातात. निवडणूक आयोगातर्फे निवडणुकीचा निकाल प्रत्यक्ष जाहीर होण्याआधीच लोकांचा कल काय होता, लोकांच्या भावना काय होत्या हे सांगण्याचा उद्देश या एक्झिट पोलच्या माध्यमातून केला जातो.

Exit Polls 2024 Update : अवघ्या काही तासांत एक्झिट पोलचे आकडे समोर येणार

शेवटच्या टप्प्यातील मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. निवडणुकीची वेळ संपल्यानंतर वेगवेगळ्या संस्था एक्झिट पोलचे आकडे जाहीर करतील. या एक्झिट पोलच्या माध्यमातून देशात कोणाची सत्ता येणार, कोण कोणत्या जागेवरून जिकंणार याचा अंदाज व्यक्त केला जाईल. हे आकडे समोर येण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेल आहेत.

Exit Polls 2024 Live: निवडणुकीच्या निकालापूर्वी बाजार 2% घसरला; आयटी समभागांना सर्वाधिक फटका

लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी भांडवली बाजारात 2 टक्क्यांची घसरण झाली आहे. शेअर बाजारात विशेषत: आयटी कंपन्यांच्या समभागांना मोठा फटका बसला आहे. 31 मे रोजी संपलेल्या आठवड्यात आयटी कंपन्यांच्या समभागांच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. जीडीपी दर, एक्झिट पोल्सचे अंदाज, मे महिन्यातील एफ अँण्ड ओ एक्सपायरी आणि परकीय गुंतवणुकदारांनी लावलेला विक्रीचा सपाटा यामुळे शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. तरीही मान्सूनविषयी सकारात्मक अंदाज, कंपन्यांच्या उत्पन्नाविषयीचे संमिश्र अंदाज आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणुकदारांनी केलेल्या खरेदीमुळे शेअर बाजारातील पडझड रोखून धरली आहे.

Exit Polls 2024 Live Updates: एक्झिट पोल्समधील सखोल विश्लेषण आणि सामाजिक-आर्थिक घटकांबाबतच्या अपुऱ्या माहितीचा अभाव

Lok Sabha Elections 2024 Exit Poll Results Live Updates: जात आणि विविध सामाजिक-आर्थिक घटकांबद्दल अपुऱ्या माहितीमुळे एक्झिट पोल्सच्या अचूकतेवर परिणाम  होऊ शकतो. देशातील शेवटची जनगणना 1934 मध्ये झाली होती. यानंतरच्या काळात समाजातील जातीय समीकरणे आणि त्यांचा प्रभाव बदलला आहे. अपुरी माहिती असल्यास निकालात त्याचा काय परिणाम होईल,याचे विश्लेषण करणे अवघड होते. याशिवाय, मतदार कोणत्या आर्थिक स्तरातून येतात याची माहिती उपलब्ध नसेल तरी एक्झिट पोल्सच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो.

Exit Poll 2024 Live : एक्झिट पोल्सच्या मर्यादा काय?

एक्झिट पोलची गुणवत्ता आणि अचूकता ही आर्थिक बाबी आणि वेळेची मर्यादा या दोन घटकांवरही अवलंबून असते. अनेक माध्यम संस्थाकडे एक्झिट पोलसाठी पुरेसे पैसे नसतात. त्यामुळे सखोल विश्लेषण आणि डेटा गोळा करण्याला मर्यादा येतात. याशिवाय, एक्झिट पोल्सचे निकाल हे अत्यंत कमी वेळात द्यावे लागतात. त्यामुळे एक्झिट पोल्ससाठी आखून दिलेल्या प्रचलित प्रक्रियांना फाटा देऊन शॉर्टकर्ट वापरले जातात. उदाहरणार्थ फोनवरुन मतदारांचे मत जाणून घेतले जाते. त्यामुळे ग्राऊंडवरील परिस्थितीचा नेमका अंदाज येऊ शकत नाही. 

Kangana Ranaut Voting : कंगना रणौतने बजावला मतदानाचा हक्क, नागरिकांना जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्याचे आवाहन

अभिनेत्री कंगना रणौत यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. रणौत या भाजपाच्या तिकिटावर हिमाचल प्रदेशमधील मंडी या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. 





West Bengal Lok Sabha 7th Phase Polling : पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या दिवशी बॉम्बफेक, टीएमसी-आयएफएस कार्यकर्त्यांत धक्काबुक्की!

पश्चिम बंगालमध्ये सातव्या टप्प्याचे मतदान होत आहे. मात्र या राज्यातील दक्षिण 24 परगना या भागात हिंसेच्या काही घटना घडल्या. या भागात बॉम्बफेक झाल्याचे समोर आले आहे. दक्षिण 24 परगना शहरातील भांगड या भागात ही बॉम्बफेक झाली आहे.


जादवपूर लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या भांगडमधील सतुलिया या भागात आयएफएस आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांत धक्काबुक्की झाली. यात दोन्ही बाजूचे एकूण दहा कार्यकर्ते जखमी झाले आहेत.

Bhagwant Mann On India Alliance Meeting : भगवंत मान इंडिया आघाडीच्या बैठकीला जाणार

आज लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान आहे. दुसरीकडे याच दिवशी विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक पार पडणार आहे. इंडिया आघाडीतील घटकपक्ष या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री तथा आप पक्षाचे नेते भगवंत मान यांनी या बैठकीवर प्रतिक्रिया दिली. मी या बैठकीला जाणार आहे, असे भगवंत मान यांनी सांगितले आहे. 

Lok Sabha Election J P Naddda Voting : जेपी नड्डा यांनी बजावला मतदानाचा हक्क!

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सपत्निक मतदानाचा हक्क बजावला.  त्यांनी हिमचाल प्रदेशमध्ये जात बिलासपूरमधील मतदान केंद्रावर मतदान केले. मतदान केल्यानंतर त्यांनी जनतेला जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले. 


 





Mumbai Mega Block Updates : आज सर्वाधिक लोकल रद्द, ठाण्यात जाणाऱ्या लोकल 20-25 मिनिटे उशिराने

मेगाब्लॉकअंतर्गत आज सर्वाधिक लोकल रद्द आहेत. परेल आणि भायखळा पर्यंतच मध्य रेल्वे धावत आहे. त्यामुळे 20 ते 25 मिनिटांच्या फरकाने लोकल ठाणे स्थानकात येत आहेत. यामुळे प्रवाशांना त्रास होताना दिसत आहेय मध्य रेल्वेने सांगूनही ऑफिस सुट्टी देत नाहीये. कामाला जावेच लागत आहे. ब्लॉक आहे हे एक आठवडा आधी का सांगितलं नाही, असं सांगितलं जातंय, अशा प्रतिक्रिया प्रवासी व्यक्त करत आहेत. 

Loksabha Election 2024 Phase Seven : जास्तीत जास्त संख्येने मतदान करा, नरेंद्र मोदींचे मतदारांना आवाहन

आज लोकसभा निवडणुकीसाठी सातव्या टप्प्यातील मतदान होत आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी मतदारांना जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडून मतदान करावे असे मोदी म्हणाले आहेत. 


 





Narendra Modi And Kangana Ranaut Constituency Voting : नरेंद्र मोदी ते कंगणा रणौत, सातव्या टप्प्यात कोण-कोणते दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात?

आज देशात होणाऱ्या सातव्या टप्प्यातील मतदानात अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचादेखील समावेश आहे. ते वाराणसी या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दुसरीकडे हिमाचल प्रदेशमधील मंडी या जागेवरूनअभिनेत्री कंगणा रणौत यादेखील निवडणूक लढवत आहेत. त्या भाजपच्या उमेदवार आहेत. केंद्रीय मंत्री तथा भाजपचे नेते अनुराग ठाकूर हेदेखील भाजपच्या तिकिटावर  हिमाचल प्रदेशमधील हमीरपूर या जागेवर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तृणमूल काँग्रेसचे द्वितीय क्रमांकचे नेते अभिषेक बॅनर्ज हे पश्चिम बंगालमधील डायमंड हार्बर या जागेवरून निवडणूक लढवत आहेत. या जागेवरही आज सातव्या टप्प्यात मतदान होत आहे.

Lok Sabha Election 2024 7th Phase Update : कोणत्या राज्यांत कोणत्या पक्षाचे किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात?

आज होणाऱ्या सातव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीत एकूण 904 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या टप्प्यात बसपाचे 56, भाजपचे 51, काँग्रेसचे 31 उमेदवार रिंगणात आहेत. पंजाबमध्ये संपूर्ण 13 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. पंजाबमध्ये एकूण 328 उमेदवार रिंगणात आहेत. दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये 13 जागांसाठी 144,  बिहारमध्ये 8 जागांसाठी 134, तर पश्चिम बंगालमधील 9 जागांसाठी 124 जागांसाठी मतदान होत आहे.

Odisha And Himachal Pradesh Assembly Election : ओडिशा, हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या जागांसाठी मतदान

देशातील ओडिशा आणि हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या जागांसाठी मतदान होत आहे. लोकसभेच्या सातव्या टप्प्यासह ओडिशाच्या उर्वरित 42 तर हिमाचल प्रदेशमधील (पोटनिवडणूक) 6 विधानसभा जागांसाठी मतदान होत आहे.

Lok Sabha 7th Phase Election Updates : देशात कोणत्या राज्यांत किती जागांवर मतदान? जाणून घ्या सविस्तर

लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात सात राज्यांसह एका केंद्रशासित प्रदेशातील एकूण 57 जागांवर मतदान होणार आहे. यामध्ये पंजबामधील सर्व 13, हिमाचल प्रदेशमधील सर्व 4 जागांवर मतदान होईल. तर उत्तर प्रदेशातील 13,  पश्चिम बंगालमधील 9, बहिरामधील  8, ओडिशा 6, झारखंड आणि चंदीगडधील प्रत्येकी तीन जागांवर मतदानाची प्रक्रिया पर पडणार आहे.

Loksabha Election 2024 Exit Polls : संध्याकाळी एक्झिट पोल येणार, देशात कोणाची सत्ता!

सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर संध्याकाळी वेगवेगळ्या संस्था आपल्या मतदानोत्तर चाचण्या सार्वजनिक करतील. या चाचण्यांत देशात कोणाची सत्ता येईल याचा अंदाज बांधला जाईल. या निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे.

Lok Sabha Election 7th Phase Voting : शेवटच्या टप्प्यात 57 जागांवर मतदान, 904 उमेदवार रिंगणात

आज देशात लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या सातव्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दिग्गज नेत्यांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. दरम्यान आज एकूण 57 जागांवर मतदान होणार असून 904 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

पार्श्वभूमी

Lok Sabha Election Exit Poll 2024 LIVE Updates : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. त्यानंतर सर्वात जलद आणि अचूक एक्झिट पोल एबीपी माझावर वाचायला मिळणार आहे. आज संध्याकाळी एबीपी माझावर आपण पाहणार आहोत या लोकसभेचा सर्वात मोठा एक्झिट पोल. देशात कोणाचं सरकार बनणार? मोदी हॅटट्रिक साधणार की इंडिया आघाडी बाजी मारणार? महाराष्ट्राच्या 48 जागांपैकी कुणाला किती जागा मिळणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एक्झिट पोलच्या माध्यमातून मिळणार आहेत.


ABP-CVoter एक्झिट पोल कुठे पाहाल?


Youtube वर एबीपी माझा यूट्यूब चॅनलवर तुम्ही थेट चर्चा आणि देशाच्या मूडचे अचूक आकलन पाहू शकता.


x वर (ट्विटर) 


ABP Majha त्याच्या X हँडलवर एक्झिट पोलचे अपडेट शेअर करेल.


एबीपी माझा ॲपवर


तुम्ही लोकसभेच्या निवडणूक 2024 च्या मतदानाच्या सातव्या टप्प्यातील आणि एक्झिट पोलचे सर्व नवीनतम अपडेट्स अँड्रॉइड आणि iOS वर ABP Live ॲपवर डाउनलोड आणि पाहू शकता.


एबीपी माझा वेबसाइटवर


तुम्ही marathi.abplive.com वर लॉग इन करू शकता आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील प्रत्येक प्रमुख उमेदवाराच्या संभाव्यतेबद्दल माहिती मिळवू शकता.


देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या निवडणुकीच्या नवीनतम आणि महान कव्हरेजसाठी ABP Live ला फॉलो करा.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.