मुंबई : कथित वादग्रस्त ऑडिओ प्रकरणी मोठ्या सुट्टीवर गेलेल्या राधेशाम मोपलवार यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळच्याव्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार स्वीकारला आहे. चौकशी समितीने क्लीनचिट दिल्याने मोपलवार पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण?

सुरुवातीपासून वादग्रस्त ठरलेला समृद्धी महामार्ग प्रकल्प एका नव्या वादात सापडला होता. या प्रकल्पाचे प्रमुख अधिकारी राधेश्याम मोपलवार यांचे वादग्रस्त फोन संभाषणं समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल झाले होते.

ज्या समृद्धी महामार्गावरून सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये रण सुरु आहे, त्याच महामार्गाची जबाबदारी असलेल्या एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष आणि संस्थापकीय संचालक मोपलवार यांच्यावर एक गंभीर आरोप झाला आहे. धक्कादायक म्हणजे हा आरोप सेटलमेंटचा होता.

शेतकऱ्यांच्या मते या ऑडिओ क्लिपमध्ये मोपलवार आणि एक मध्यस्थ यांच्यात एका इमारतीच्या बांधकामावरून सेटलमेंट सुरु आहे.

मोपलवारांची कारकीर्द

वादग्रस्त कारकीर्द असलेल्या मोपलवारांना आघाडी सरकारच्या काळापासून  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कोकण विभागीय आयुक्त अशा प्लम पोस्टिंग मिळाल्या आहेत. भाजप सरकार आल्यानंतरही त्यांना मर्जीची खाती मिळाली.

मोपलवारांचं स्पष्टीकरण

”माझ्यावर केलेले आरोप हे मला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. समृद्धीची जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे माझ्यावर आरोप होत आहेत. काही लोक माझ्या खाजगी आयुष्याला लक्ष करून मला ब्लॅकमेल करत आहेत. यापूर्वीच्या प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे आणि चौकशीअंती तथ्य समोर येईल.” असं स्पष्टीकरण मोपलवार यांनी दिलं होतं.

संबंधित बातम्या

एबीपी माझाचा गौप्यस्फोट, महामार्गात दलालांची ‘समृद्धी’?

‘मोपलवारांसोबतची ‘ती’ ऑडिओ क्लीप खरी, तो आवाज माझाच’

राधेश्याम मोपलवार ईडी आणि सीबीआयच्या रडारवर 

मोपलवार प्रकरणावरुन धनंजय मुंडेंचा सरकारवर घणाघात

मोपलवार वाद: बाबा, त्यावेळी तुम्ही झोपला होता का, फडणवीसांची टीका