चारित्र्याच्या संशयावरुन पतीकडून डॉक्टर पत्नीची हत्या
एबीपी माझा वेब टीम | 14 Jul 2016 07:47 AM (IST)
पुणे: पिंपरी-चिंचवडच्या वाकडमध्ये संगणक अभियंत्याने डॉक्टर पत्नीची हत्या केली आहे. काल रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. अंजली पाटेदार असं या महिलेचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पती मनोज पाटेदारला अटक केली आहे. दोघांमध्ये रुग्णालयामध्ये वाद झाला होता. त्यानंतर या वादाचं रुपांतर हत्येत झालं. घरगुती वादातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. दरम्यान, ही आरोपीची तिसरी पत्नी आहे. यापूर्वी त्याच्या एका पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास होण्याची शक्यता आहे.