नागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी यापुढे निवडणूक घेतली जाणार नाही. आता सर्वसहमतीने संमेलनाध्यक्षांची निवड केली जाईल. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या नागपुरात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
साहित्य महामंडळाने संमेलनाध्यक्षपदासाठी निवडणूक न घेण्याबाबत घटना दुरुस्ती केली. या घटना दुरुस्तीला घटक संस्थांची मान्यता मिळाल्यानंतर निर्णायाची अंमलबजावणी केली जाईल.
तसेच, आगामी म्हणजेच 92 व्या साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी वर्धा आणि यवतमाळ या स्थळांची निवड करण्यात आली आहे. म्हणजेच 92 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन या दोन पैकी एका ठिकाणी होईल.
गेल्या काही वर्षांमध्ये साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक आणि वाद असे समीकरण बनले होते. संमेलन म्हटलं की वाद, असेच चित्र डोळ्यांसमोर येत असे. मात्र आजच्या निर्णयामुळे हे समीकरण दूर होण्यास मदत होईल.
मराठी साहित्य वर्तुळात अ. भा. साहित्य संमेलनाला मोठं महत्त्व आहे. अनेक दशकांची परंपरा या संमेलनाला आहे. मराठीतील दिग्गज साहित्यिकांनी संमेलनाध्यक्षपदाची पालखी आपल्या खांद्यावर घेतली आहे. मात्र तरीही अनेक प्रतिभावान साहित्यिक केवळ निवडणुकीच्या प्रक्रियेमुळे संमेलनाध्यक्षपदापासून दूर राहिले. त्यामुळे आता निवडणूकच होणार नसल्याने अनेक प्रतिभावान साहित्यिक संमेलनाध्यक्षपदाच्या खुर्चीत विराजमान होतील, अशी आशा बाळगायला काही हरकत नाही.
निवडणूक बंद, आता सर्वसहमतीने साहित्य संमेलनाध्यक्ष निवडणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jul 2018 06:48 PM (IST)
आगामी म्हणजेच 92 व्या साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी वर्धा आणि यवतमाळ या स्थळांची निवड करण्यात आली आहे. म्हणजेच 92 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन या दोन पैकी एका ठिकाणी होईल.
प्रातिनिधिक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -