भ्रष्टाचार जनांदोलनाचे विश्वस्त अॅडव्होकेट अजित देशमुख यांनी अवर सचिव शोभा बोरकर यांच्याकडे या संदर्भामध्ये तक्रार केली होती. यावरुन औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणुकीतील प्रशिक्षणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये जेमतेम दहा ते बारा दिवसाचा मंडप लावण्यात आला होता. त्याचे बिल नऊ कोटी रुपयांच्या घरात गेलं आहे, अशी माहिती अजित देशमुख यांनी दिली आहे.
केवळ मंडपातच नाही तर निवडणुकीदरम्यान जे काही होर्डींग जिल्ह्यामध्ये लावण्यात आले होते. सोबत पॅम्पलेट छापण्यात आले होते, याचाही खर्च 60 लाख रुपये झाला आहे. आता या प्रकरणाची चौकशी होणार आहे. आणखी निवडणूक विभागातील खर्चामध्ये कुठे वाढ झाली आहे का? त्याचीही माहिती मागवली जात असल्याचे पाहायला मिळत आहे.
निवडणूक विभागाकडून घोटाळा?
निवडणुकीदरम्यान कर्माचाऱ्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. यासाठी मंडप, होर्डींग, पॅम्पलेटसह अनेक साहित्यांची गरज असते. प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशीही निवडणूक केंद्रांवर अनेक साहित्यांची आवश्यकता असते. यासाठी प्रत्येक मतदारसंघानुसार विशिष्ट रक्कम दिली जाते. मात्र, बीड जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या खर्चावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कारण, फक्त मंडपाचा खर्च 9 कोटी रुपये झाला आहे. तर, पॅम्पलेटचा खर्च 60 लाख रुपये झाला आहे.
संबंधित बातम्या -
- Beed ZP Election | बीडमध्ये पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का, झेडपीवर राष्ट्रवादीचा झेंडा
- स्त्री भ्रूण हत्यांवरुन गाजलेल्या बीडमध्ये एकाच मांडवाखाली तब्बल 802 मुलींचे नामकरण
Dhananjay Munde | धनंजय मुंडे मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच भगवानगडावर | बीड | ABP Majha