देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये


1. वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं 'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' पुस्तक अखेर मागे, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची माहिती, लेखक जयभगवान गोयल यांच्याकडूनही माफी

2. महागाईने पाच वर्षातला उच्चांक गाठला, भाज्यांसह जीवनावश्यक वस्तू महागल्या, महागाई दर 7.35 टक्क्यांवर गेल्याने सरकारची कसोटी

3. मुंबईतील वाडिया रुग्णालयप्रकरणी आज मुख्यमंत्र्यांची बैठक, तर राज ठाकरेंचीही अजित पवारांशी चर्चा, वाडिया रुग्णालय वाचवण्याची हाक

4. धावत्या ट्रेनमधून चोरट्याने महिलेच्या हातातली पर्स हिसकावली, महिला ट्रेनमधून पडता-पडता वाचली, तेजस एक्स्प्रेसमधला प्रकार असल्याचा पोलिसांना संशय

5. मुंबई विद्यापीठाच्या थिएटर ऑफ आर्टसचे संचालक योगेश सोमण सक्तीच्या रजेवर, इंदिरा गांधींबद्दलचा आक्षेपार्ह व्हिडीओ सोमण यांना भोवण्याची शक्यता

6. राजकीय प्रचारासाठी विद्यार्थ्यांचा वापर होता कामा नये, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची शाळांना नोटीस, भाजपच्या सीएए प्रचार मोहिमेला धक्का

7. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन भारतात जे होतंय ते दु:खद, बझफीडच्या संपादकांच्या प्रश्नाला मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांचं उत्तर

8. पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांची फाशी रद्द, शिक्षा सुनावणारं विशेष कोर्ट घटनाबाह्य असल्याचं लाहोर हायकोर्टाचं मत

9. भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान आज मुंबईत पहिला एकदिवसीय सामना, वानखेडेवरची लढाई जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज

10. नवी दिल्लीत 18 ते 22 फेब्रुवारीदरम्यान आशियाई कुस्ती स्पर्धा, महाराष्ट्राचा पैलवान राहुल आवारेची भारतीय संघात निवड