मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण की, निवडणूक आयोगांन त्यांच्यविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आता आदेश दिले आहेत.
दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र त्रिवेंद्री यांनी काहीच दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेऊन त्यांच्याकडे दानवे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी तक्रार केली होती. तसेच दानवेंवर कारवाईची मागणीही त्यांनी केली होती.
काय आहे नेमकं प्रकरण:
पैठणमधील प्रचारसभेत बोलताना रावसाहेब दानवेंनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. “मतदानापूर्वीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण त्या रात्री घरात लक्ष्मी येते. त्या लक्ष्मीचा स्वीकार करा.”, असं वादग्रस्त वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं होतं.