त्र्यंबकेश्वरमध्ये दोन पुरोहितांकडून 2 कोटी, साडेचार किलो सोनं जप्त
एबीपी माझा वेब टीम | 28 Dec 2016 09:43 PM (IST)
नाशिक: नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये दोन पुरोहितांकडून आयकर विभागाला कोट्यवधीचं घबाड सापडलं आहे. दोन दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वरचे पुरोहित गणपती शिखरे आणि निषाद चांदवडकर यांची आयकर विभगानं चौकशी केली होती. त्यानंतर आता त्यांच्याकडे कोट्यवधींचं घबाड असल्याचं समोर येतं आहे. या दोन्ही पुरोहितांकडून 2 कोटींची रोख रक्कम आणि तब्बल साडेचार किलो सोनं आयकर विभागानं हस्तगत केलं आहे. याशिवाय त्यांच्या अनेक मालमत्ता आहेत. त्याचीही चौकशी सध्या सुरु आहे. आयकर विभाग पुरोहितांकडे येणाऱ्या पैशांवर बारीक नजर ठेवून होते. याच पैशातून अनेक पुरोहित धनाढ्यही झाले आहेत. त्यामुळे आता आयकर विभागाने त्र्यंबकेश्वरच्या धनदांडग्या पुरोहितांकडे आपला मोर्चा वळवल्याचं कळतं. त्र्यंबकेश्वर मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी जातात. त्यात अनेक व्हीआयपींचा समावेश असतो. त्यातून लाखो रुपयांची उलाढाल होते. त्र्यंबकेश्वराच्या पूजेसाठी पुरोहित वर्ग मोठी दक्षिणा घेतात. सर्वत्र कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य असलं, तरी पूजेसाठी कोणत्याही ई-व्यवहाराची सोय नाही. संबंधित बातम्या: