मुंबई : पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी निवडणूक अधिकाऱ्याला धमकवाल्याप्रकरणाचा निवडणूक आयोगाचा अहवाल 'माझा'च्या हाती लागला आहे. या अहवालामध्ये निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी कठोर शब्दात जानकर यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.
काय आहे निवडणूक आयोगाचा अहवाल?
महादेव जानकर यांच्यावर निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी कठोर शब्दात ताशेरे ओढले आहेत.
देसाईगंज नगरपरिषदेचे उमेदवार मोटवानी यांना कप बशी चिन्ह देण्याचा आग्रह करण्यामध्ये जनतेचे काय हित आहे, असा खोचक सवाल या अहवालात विचारण्यात आला आहे.
मोटवानी यांची काँग्रेस उमेदवारी रद्द करण्यासाठी विनंती करणे बेकायदेशीर असल्याचं या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. मंत्र्यांचे कृत्य हे भ्रष्टाचार असल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलंय.
कॅबिनेट पदाचा गैरवापर करून निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव आणल्याचं या अहवालात स्पष्ट होत आहे. या प्रकरणी आयोगाने योग्य कारवाई केली नाही तर आयोगाच्या निपक्षतेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहू शकते, अशी चिंता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
गडचिरोली जिल्ह्यातील वडसा नगरपालिकेसाठी दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. याठिकाणी आपण पाठिंबा दिलेल्या उमेदवाराला कपबशी हेच चिन्ह द्या, अशी मागणी महादेव जानकर यांनी संबंधित अधिकाऱ्याकडे केली होती. शिवाय काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्याच्या सूचनाही यावेळी जानकर यांनी निवडणूक अधिकाऱ्याला दिल्या.
यासंबंधीचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे वृत्त वाहिन्यांवरुनही प्रसारित झाले. यानंतर काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे धाव घेत, जानकरांविरोधात तक्रार दाखल केली होती.
संबंधित बातम्या :
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशावरुन महादेव जानकरांवर गुन्हा दाखल
दुग्धविकास मंत्री महादेव जानकरांना निवडणूक आयोगाची नोटीस
निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव नव्हे, विनंती केली, जानकरांचं स्पष्टीकरण
काँग्रेसचा अर्ज बाद करायचा, महादेव जानकरांचा व्हिडीओ व्हायरल