बेळगाव : बेळगावातील शाळकरी विद्यार्थिनीने स्वतःला मिळालेल्या बक्षिसाच्या रक्कमेचा वापर मतदानासाठी जनजागृती करण्यासाठी केला आहे. श्रेया विश्वनाथ सव्वाशेरी असे तिचे नाव असून बेळगाव बालिका आदर्श विद्यालयाची विद्यार्थिनी आहे.
श्रेया बाल कीर्तनकार असून तिने वडगाव ज्ञानेश्वर मंदिर, ज्ञानेश्वर भजनी मंडळ यांच्या सहकार्यातून ‘आम्ही सारे मतदान करू इतरांनाही प्रेरित करू शंभर टक्के मतदान करु’ हा संकल्प कीर्तनाच्या माध्यमातून मांडला आहे. श्रेयाला गायन स्पर्धा, पोवाडे आणि अन्य स्पर्धेत बक्षीस म्हणून रोख रक्कम मिळाली आणि त्या रक्कमेचा उपयोग 100 टक्के मतदान जनजागृतीसाठी केला आहे.
श्रेयाने कीर्तनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला 100% मतदान करण्याचे आवाहन करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. विविध ठिकाणी झालेल्या गायन,पोवाडा आणि वक्तृत्व स्पर्धेत अनेक पारितोषिके मिळाली आहेत. बक्षिस म्हणून मिळालेली रक्कम तिने मतदान जागृतीसाठी वापरुन समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
शिवराय, संतांची भूमी महाराष्ट्राला स्थिर सरकार व योग्य नेतृत्व मिळावं या उद्देशाने परत एकदा कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीकरिता खर्च केली आहे. श्रेया ही बालवक्ता, नृत्यांगना, अभिनय, पोवाडा, गायन, गायिका, कीर्तनकार, मूवी चाइल्ड कलाकार असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे.
ज्ञानेश्वर भजनी मंडळ वडगाव संत मुकुंद पालकर, फकीरा कुंडेकर, श्रीनिवास ताळूकर, रवी पाटील, प्रकाश भंडारे यांच्यासह संत गणांच्या सहाय्याने मतदान जागृती कार्यात सहभाग घेतला आहे. अभिषेक तुनी व कार्तिक के झेड प्रोडक्शन यांनी चित्रित केले असून या कार्यात शाळेचे मुख्याध्यापक एन.ओ. डोणकरी , शिक्षक एकनाथ पाटील, उमेश बेळगुंदकर यांनी मार्गदर्शन केले.
कीर्तनाच्या माध्यमातून केली मतदान जनजागृती ; खर्च केली बक्षिसाची रक्कम
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Oct 2019 04:24 PM (IST)
श्रेयाने कीर्तनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला 100% मतदान करण्याचे आवाहन करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. बक्षिस म्हणून मिळालेली रक्कम तिने मतदान जागृतीसाठी वापरुन समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -