गोव्यातील वास्कोमध्ये कैद्यांचा जेल तोडून पलायनाचा प्रयत्न
एबीपी माझा वेब टीम | 25 Jan 2017 08:09 AM (IST)
पणजी : गोवा राज्यातील वास्कोमध्ये 49 कैद्यांनी वास्कोतील जेल तोडून पलायन करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने कैद्यांचा हा प्रयत्न अयशस्वी झाला. यावेळी झालेल्या गोंधळात एका गँगस्टरची हत्याही करण्यात आली आहे. कैद्यांना पांगवताना जेल अधीक्षक आणि जेल गार्ड जखमी झाले आहेत. गोव्याच्या वास्कोतील सडा जेलमध्ये 49 कैद्यांनी सामुहिक पलायनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना वेळीच या घटनेची माहिती मिळाली. त्यामुळे कैद्यांचा पलायनाचा प्रयत्न अयशस्वी झाला आहे. या घटनेवेळी झालेल्या गोंधळात 6 कैदी जखमी झाले आहेत, तर एकाचा मृत्यू झाला आहे. वास्कोतील जेल तोडण्याच्या घटनेनंतर सडा जेल परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. तसंच 200 पोलीस कर्मचाऱ्यांनी जेल परिसरात गस्तही घातली. यावेळी झालेल्या गोंधळात जखमी झालेल्यांना बांबोळीमधील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं.