मुंबई : शिंदे गटाला () ढाल-तलवार चिन्ह (Sword and Shield Dhal Talwar) देण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) याबाबचा निर्णय दिलाय. काल ठाकरे गटाला मशाल (Mashal) चिन्ह देण्यात आल्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला नवे तीन पर्याय देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर शिंदे गटाने निवडणूक आयोगाला तीन पर्या देण्यात आले होते. त्यातून त्यांना ढाल-तलवार चिन्ह देण्यात आलंय. 


निडणूक आयोगाने काल दोन्ही गटांना पक्षाची नावं दिली. यात ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आलंय. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव दिलं होतं. शिवाय ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिलं होतं. तर शिंदे गटाला दुसऱ्या तीन चिन्हांचा पर्याय देण्याचे निर्देश देण्यात आले होते.  त्यानंतर शिंदे गटाकडून आज ढाल-तलवार, उगवता सूर्य आणि पिंपळाचं झाड अशी तीन चिन्हं देण्यात आली होती. त्यातील ढाल-तलवार हे चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिले आहे. 


शिंदे गटाला देण्यात आलेल्या चिन्हामध्ये दोन तलवारी आणि त्यामध्ये ढाल आहे. तळपता सूर्य हे चिन्ह शिंदे गटाने पहिल्या पसंतीस दिले होते. परंतु, निवडणूक आयोगाने हे चिन्ह शिंदे गटाला नाकारलं आहे. कारण उगवता सूर्य आणि तळपता सूर्य यामध्ये गोंधळ होऊ शकतो. कारण उगवता सूर्य हे पहिल्यापासूनच डीएमके पक्षाचं चिन्ह आहे. याबरोबरच मिझोराम नॅशनल पक्षाचं देखील उगवता सूर्य हे चिन्ह आहे. त्यामुळे शिंदे गटाला उगवता सूर्य हे चिन्ह नाकारण्यात आलंय.  


शिंदे गटाला ढाल-तलवार हे चिन्हं दिल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते भरत गोगावले यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.  ''आम्हाला एकदम योग्य चिन्ह मिळालं आहे. ढालीने जनतेचं रक्षण करायचं आणि कोणी अंगावर आलं तर तलवार समोर धरायची. ढाल आणि तलवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून असून आमच्यासाठी ही चांगली बाब आहे, असे गोगावले यांनी म्हटले आहे.  


निवडणूक आयोगाने हा निर्णय फक्त अंधेरी पोट निवडणुकीसाठी दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत आपला ठाकरे गटाविरोधात आपला उमेदवार उतरवरणार काय हे येणाऱ्या काळात समजेल.   


महत्वाच्या बातम्या


Shivsena : ठाकरे गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव, तर शिंदे गट आता 'बाळासाहेबांची शिवसेना' 


Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray : धगधगत्या मशालीने घडविला होता इतिहास, शिवसेना अन् मशालीचं नात जुनंच