Eknath Shinde :  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात आमची दुसरी इनिंग सुरु झालेली आहे. आत्तापर्यंत आम्ही वारकऱ्यांसाठी सर्व काही करत आलोय. हे तुम्ही पाहत आलेला आहात. यापुढं ही आम्ही करत राहू असं वक्तव्य राज्याचे उपमख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलं. आमचं खूप पटापट कामं असतं. "नो रिझन, ऑन दि स्पॉट डिसीजन" असं आमचं काम असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. लाडक्या बहिणी इथं आहेत. बरेच जण या योजनेबद्दल बरंच काय-काय बोललं जातंय. मात्र मी सांगतो, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आम्ही प्रिंटिंग मिस्टिक वाले नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले. 

Continues below advertisement


आळंदीत कैवल्य संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या 750 जन्मोत्सवानिमित्ताने समाधी मंदिरावर अकरा किलोचा सुवर्ण कलशारोहण सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्याची सुरुवात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाद्वार पूजनाने झाली आहे. तर कलशाची पूजा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली आहे. या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आळंदीत बोलत होते. 


मुख्यमंत्री आणि मी नशीबवान आहोत


आळंदी हे महाराष्ट्रातील सोन्याचं पिंपळ आहे. या पिंपळाला दंडवत. वारकरी परंपरा खूप मोठी आहे. ही परंपरा पुढं घेऊन जाण्याचं काम खूप मोठं आहे. माऊलींच्या भाविकांना फक्त आवाहन केलं गेलं अन बघता बघता 22 किलोचे सुवर्ण कलशारोहन झालं. वारकरी संप्रदायाला आवाज दिला की काय आश्चर्य घडतं हे आज आपण यानिमित्ताने अनुभवतोय. आम्ही दोघे (मुख्यमंत्री आणि मी) पांडुरंगाचे वारकरी आहोत असे एकनाथ शिंदे म्हणाले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी एकेकाळी काय भोगलं आणि आज त्यांच्या समाधी मंदिरावर सुवर्ण कलशारोहन झालं. मुख्यमंत्री आणि मला हे भाग्य लाभलं, आम्ही नशीबवान आहोत. माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं हे भाग्य असल्याचे शिंदे म्हणाले. 


ज्ञानोबा हे वारकऱ्यांचा श्वास 


जे करायचं ते मनापासून करायचे. आज मला एका ऐतिहासीक क्षणाचे साक्षीदार होण्याचं भाग्य लाभलं असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. ज्ञानोबा हे वारकऱ्यांचा श्वास आहे. ज्ञानोबा तुकोबांचा गजर ही मोठी प्रेरणा असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. भागवत धर्माचं आळंदी तिर्थस्थळ आहात असे एकनाथ शिंदे म्हणाले. आजच्या काळात नव्या पिढीला ज्ञानेश्वरी पोहोचवायची असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वारपक गरजेचा असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. भागवत धर्माला जीवंत ठेवण्याचं काम वारकऱ्यांनी केलं आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Chandrakant Patil: आळंदी विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यासाठी 25 कोटी देणार; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा