जळगाव: भाजपच्या दोन-चार नेत्यांना वर्षभरापूर्वीच तुरुंगात टाकलं असतं तर आज ही परिस्थीती आली नसती असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे जळगाव दौऱ्यावर असताना त्यांच्या समोरच हे वक्तव्य केलं आहे. 


एकनाथ खडसे म्हणाले की, "गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी मी नेहमी सागंतो की गृहमंत्रीपदाचा हिसका दाखवा. भाजप नेत्यांची शेकडो प्रकरणं आहेत, त्यांच्यातील दोन-चार जणांना कायदेशीर मार्गाचा वापर करुन जर वर्षभरापूर्वीच आत टाकलं असतं तर आज ही परिस्थिती आली नसती."


एकनाथ खडसे म्हणाले की, "मला नाहक त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनिल देशमुखांनाही काही कारण नसताना तुरुंगात टाकलं आहे. मला जर आत टाकण्याचा प्रयत्न केला तर मी तुम्हालाही घेऊन बुडणार हे लक्षात ठेवा."


एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, "माझ्यात क्षमता होती म्हणून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होतो, पोरीबाळीच्या नादी लागून हे होत नाही. अलीकडचं राजकारण देशाचं नाही तर द्वेषाचं होत आहे. तुमच्या विरोधात बोलले की लगेच मागे लागले जाते."


यावेळी खडसे यांनी शरद पवारांचा उल्लेख महाराष्ट्राचे जाणते राजे असा केला. ते म्हणाले की, पवार हे अलीकडे महाराष्ट्राच्या राजकारणाचे चित्र बदलणारा नेते आहेत.  देवेंद्र फडणवीस म्हणत होते की, कोणी पहिलवान बाकी नाही. पण पवारांनी एका रात्रीतून चित्र बदललं. मला स्वप्नांतही वाटत नव्हतं की हे तीन पक्ष एकत्र येतील.  पण त्यांनी करून दाखवलं, असंही खडसे म्हणाले. 


महत्त्वाच्या बातम्या: