BJP leader Kirit Somaiya Press Conference : महाविकास आघाडीविरोधात आक्रमक भूमिका घेत आरोपांची राळ उडवणारे भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya)  यांनी आज पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबीयांवर निशाणा साधला आहे. ठाकरे सरकार आणि ठाकरे कुटुंबीयांविरोधात पुन्हा एकदा आरोपांची माळ सोमय्यांनी लावली. हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदीला कुठं लपवलं आहे हे मुख्यमंत्र्यांनी (CM Uddhav Thackeray) सांगावं. ठाकरे परिवाराशी संबंध असलेल्या चतुर्वेदीला फरार घोषित करा. आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, श्रीधर पाटणकर यांच्याशी चतुर्वेदीचे व्यवहार समोर आले आहेत, असं म्हणत किरीट सोमय्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. 


पत्रकार परिषदेत एकापाठोपाठ एक आरोप करणाऱ्या किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकारला पाच प्रश्न विचारले आहेत. जाणून घेऊया ते प्रश्न कोणते? 


1. हवालाकिंग असल्याचा आरोप असणारे नंदकिशोर चतुर्वेदींना कुठं लपवलंय?
2. नंदकिशोर चतुर्वेदींना फरार का घोषित करत नाही? 
3. मेहुणे पाटणकरांच्या 'थ्री-जी होम'शी संबंध नाही, हे ठाकरे जाहीर करणार? 
4. माझ्याविरोधात तक्रार दाखल करणारे प्रवीण कलमे आहेत कुठे? 
5. प्रवीण कलमे यांना आव्हाड की, अनिल परब वाचवत आहेत?


मनी लॉड्रिंग प्रकरणी ईडीच्या रडारवर असणारे मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावरुनही किरीट सोमय्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, "मुख्यमंत्री ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची श्रीजी होम ही कंपनी आहे. यात मनी लॉड्रिंग करून पैसे आले आहेत. ही कंपनी पाटणकर यांची आहे. यात 29 कोटी काळा पैसा गुंतवला आहे. या कंपनीचा आणि उद्धव ठाकरे यांचा संबंध काय? हे उद्धव ठाकरे यांनी सांगितले पाहिजे, असं सोमय्या म्हणाले आहेत.


दरम्यान, आज आणखी एक घोटाळा उघड करणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी आधीच सांगितलं होतं. त्यानुसार, पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्यांनी ठाकरेंवर आरोपांची तोफ डागली. सोमय्यांनी पुन्हा एकदा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरच निशाणा साधला. ठाकरे कुटुंबीयांच्या एका कंपनीचा घोटाळा उघड करू, असा इशारा त्यांनी काल दिला होता. अशातच, सोमय्यांनी आरोप करण्याआधीच आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोमय्यांवर घोटाळ्याचा आरोप केला. युवा प्रतिष्ठाननं बांधलेल्या शौचालयात घोटाळा झाल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. त्यामुळे या आरोप-प्रत्यारोपांच्या सत्राची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगल्याचं पाहायला मिळत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Kirit Somaiya : ठाकरे परिवाराशी व्यावहारिक संबंध असलेल्या हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदींना कुठं लपवलं? किरीट सोमय्यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल