Eknath Khadse :  आदिवासी आणि सामाजिक न्याय विभागाचा पैसे इतर वर्गाकडे वळवला जातो. तुम्ही तक्रार केली का? असा सवाल करत विधान परिषदेत एकनाथ खडसे (Eknath Khadse ) आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आदिवासी सामाजिक न्याय विभागाची स्वतंत्रता आणि स्वायत्तता संपली आहे. 11 टक्के मागास आणि 8 टक्के आदिवासी विभागाला पैसे दिला जातो. पण त्यात त्यांना मिळत काय? असा सवालही खडसेंनी केला. अनुसूचित आयोगाच्या चर्चेदरम्यान खडसे बोलत होते. 

 समृध्दी, शक्तिपीठ काढा पण आदिवासींना काहीतरी द्या

आदिवासी विभागाचे स्वतंत्र बजेट असायचे आता जनरलमध्ये केलं जातं. पैसे किती कापले? असा सवाल खडसेंनी केला. लाडकी बहिणीला पैसे फिरवले. आधी योजना आणल्यावर पैशाची तरतूद व्हायची. आदिवासी विभागाचा 65 वर्षात काहीच विकास झाला नाही असे खडसे म्हणाले. पिण्याच्या पाण्यासाठी नाल्याकडे जावे लागते. कुठे गेल्या तुमच्या योजना? सामाजिक न्याय मंत्रीच म्हणाले तुम्ही मांडा,  मी सरकारी पक्षात आहे असेही खडसे म्हणाले. GDP खूप वाढला म्हणता. आमचा पहिला क्रमाक म्हणता. समृध्दी, शक्तिपीठ काढा. पण आदिवासींना काहीतरी द्या असे खडसे म्हणाले. 

राज्यावर 9 लाख कोटींचे कर्ज

राज्यावर 9 लाख कोटींचे कर्ज आहे. इतके राज्य खाली कधी नव्हते. कुपोषण, वैद्यकीय, पाठीपुरवठा, शिक्षणासाठी पैसे द्या. समाजाच्या मनामनात विष पसरवले ते तुम्ही कमी करू शकणार का? आश्रम शाळेची काय ती दूरवस्था आहे. अरे.. ती माणसाची पिल्ल आहेत.  आदिवासीच्या नावाने ठेका निघतो मिळत नाही असे खडसे म्हणाले.  सामाजिक न्याय वर आजवर अन्याय झाला तो दूर होईल का? अंमलबजावणी होणार का? असे सवालही खडसेंनी केले. 

आदिवासी आश्रमशाळा ज्युनिअर कॉलेज प्राध्यापकांच्या प्रस्ताव दोन वर्षे झाली पडून आहे. का परवानगी देत नाही? असा सवाल खडसेंनी केला. शिष्यवृत्ती अजून का नाही दिली? का वाट पहावी लागते? असा सवाल खडसेंना केला. भांडी मिळत नाहीत. रेशन दुकाने नाही. आमच्याकडचे निम्म्यापेक्षा जास्त आदिवासी गुजरातमध्ये स्थलांतरित होत आहेत का नाही? ऊस तोड कामगार आदिवासी महिला इथे ऊस तोडतात दुसरीकडे प्रसूती होते. अॅम्ब्युलन्स नाही असे खडसे म्हणाले. माणूस म्हणून जगायची परवानगी त्यांना द्या असे खडसे म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Eknath Khadse on Devendra Fadnavis : भेटीसाठी VIP कक्षात बसले, पण फडणवीसांची भेट झालीच नाही; आता एकनाथ खडसे म्हणतात...