Aaditya Thackeray :  दिशा सालियन प्रकरणी (Disha Salian case) शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिशा सालीयनचा मृत्यू हा अपघातीच असल्याच्या युक्तीवादावर पोलीस ठाम आहेत. कोणताही घातपाताचा किंवा हत्येचा प्रयत्न दिसत नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणावर खुद्द आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ठराविक लोकांकडून गेल्या 5 वर्षात बदनामीचा प्रयत्न झाला. मी त्यांना कधी उत्तर दिली नाही, आजही देणार नसल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली. ज्या विषयाशी माझा संबंध नाही, ज्याची मला माहितीही नाही, त्याबाबत मी बोलणार नाही असे ठाकरे म्हणाले. 

Continues below advertisement


कर्जमाफी झाली असती तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसत्या


शेतकरी आत्महत्येच्या मुद्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संदर्भात प्रश्न विचारत आहोत. कर्जमाफी झाली असती तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसत्या असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. ससून डॉक परिसरात राहणाऱ्या कोळी बांधवांना सरकारने न्याय द्यावा हीच आमची मागणी असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले. 


पुण्याचा विषय महत्वाचा आहे. पुण्यात कॅनॉलला बुजवून जागा हडप केल्या आहेत. त्यामुळं पुण्यात लगेच पुर येतो असे आदित्य ठाकरे म्हणाले. धारावी प्रकल्पात पहिल्या यादीत काही लोकांना अपात्र केलं आहे. ही लोक बांगलादेशी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या लोकांना देवनार डंपिग ग्राऊड येथे पुर्नवसन केलं जाणार आहे. अदानीला तिथे बसवल जाणार आहे. तेथील अनेक कंत्राट कचऱ्यासंदर्भात अदानीला दिल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. 


सुधीर मुनगंटीवार एकनिष्ठ असतानाही त्यांना डावलण्यात आलं


सुधीर मुनगंटीवार हे एकनिष्ठ असतानाही त्यांना डावलण्यात आलं आहे. मग 2019 नंतर आलेल्यांना प्राधान्य देण्यात येत असल्याचा टोला आदित्य ठाकरेंनी भाजपला लगावला. मुनगंटीवार खूप प्रश्न उपस्थित करत आहेत. पत्रिका दोन्ही भाषेत येते मात्र मुनगंटीवार यांच्यासारखी मराठी प्रेमी लोक सोबत येत असतील तर स्वागत असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. मिरारोडबाबत राजन विचारे यंच्याशी बोलणं झालं आहे. हा भाषेचा वाद नाही त्या व्यापाऱ्याने दादागिरी करण्याचा प्रयत्न केला होता. फोन चार्जिंगवरुन आमच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केली आहे. मातृभाषेचा मान राखलाच पाहिजे असे आदित्य ठाकरे म्हणाले. 



महत्वाच्या बातम्या:


Disha Salian Death Case: दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना मोठा दिलासा, मुंबई पोलिसांची कोर्टात महत्त्वाची माहिती