जळगाव : जळगावच्या मेहरूण तलावाच्या काठावर आज दोन कट्टर राजकीय शत्रू एकत्र आले आणि त्यांनी कटूता दूर सारत एकत्र भोजन केलं.
मराठी प्रतिष्ठानतर्फे आयोजित भजी महोत्सवाच्यानिमित्ताने माजी मंत्री सुरेश जैन आणि एकनाथ खडसे 7 वर्षानंतर एकत्र आले आणि गप्पा मारत भजीचा आस्वाद घेतला. दोघांनीही एकमेकांना भजी खाऊ घातली.
त्यानिमित्त जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आलं होते. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी गप्पा मारल्या.
पक्के शत्रू सख्ख्या मित्रांसारखे वागू लागल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. तर जळगावातील दोन कट्टर राजकीय शत्रू एकत्र दिसल्याने अनेकांच्या भुवयाही उंचावल्या.