मी 40 वर्ष पक्षासाठी कष्ट घेतले, पण नवखे मंत्री झाले : खडसे
एबीपी माझा वेब टीम | 02 Sep 2016 10:38 AM (IST)
जळगाव : खान्देशात पक्ष वाढवण्यासाठी 40 वर्ष प्रचंड कष्ट केले, मात्र नवखे आले आणि त्यांना संधी मिळाली, अशा शब्दात खडसेंनी आज आपली नाराजी पुन्हा व्यक्त केली. विशेष म्हणजे आपल्याविरोधात कुठलाही पुरावा नसताना आपल्याला मंत्रिपद गमवावं लागल्याचं शल्यही खडसेंनी बोलून दाखवलं. आज मुक्ताईनगरात खडसेंच्या वाढदिवसानिमित्त जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं. यावेळी जिल्ह्यातून आणि राज्यभरातून कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या उपस्थितीमुळं भाजपमधील दुसऱ्या गटाचा प्रभाव पुन्हा एकदा पाहायला मिळाला.