बीड : जिल्ह्यातील पाटोदा शहरामध्ये मध्यरात्री दोनच्या सुमारास आठ ते दहा दरोडेखोरांनी एका घरावर दरोडा टाकत घरातील सदस्यांना मारहाण देखील केली आहे. या दरोडेखोरांनी घरातील तीन सदस्यांना जबर मारहाण करत घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम पळवून नेली आहे. ज्यांच्या घरी चोरी झाले ते गणेश नाईक नवरे हे निवृत्त फौजदार असून पोलीस दरोडेखोरांना पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.


पाटोदा येथे राहणाऱ्या गणेश नाईक नवरे यांच्या घरावर हा दरोडा पडला असून ते पाटोदा येथील मांजरसुंबा रोडवर राहतात. मंगळवारी रात्री घरातील सर्व लोक झोपलेले असताना मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास आठ ते दहा दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. सुरुवातीला या दरोडेखोरांनी घरातील महिलांना मारहाण करून त्यांच्या अंगावरचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम यावर डल्ला मारला. चोरटे घरात घुसल्याचं लक्षात येताच गणेश यांनी त्यांना प्रतिकार करायला सुरुवात केली. मात्र गणेश आणि त्यांच्या पत्नी तसेच आईला या दरोडेखोरांनी काठीने जबर मारहाण केली. यामध्ये हे तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीडच्या एका खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत


पोलिसांचा कसून तपास सुरु


या दरोडेखोरांनी घरातील महिलेच्या अंगावरील दागिने त्याचबरोबर घरात असलेली रोख रक्कम लंपास केली आहे. या सर्व घटनेनंतर पाटोदा पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन श्वान पथकाच्या मदतीने या चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.


हे ही वाचा - 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha