Egg Price Hike : सर्वसामान्य गरीब माणसांपासून ते अब्जाधीश व्यक्तींपर्यंत सर्वांच्याच रोजच्या आहारात अंड्याचा समावेश असतो. पण याच अंड्याचे भाव आता गगनाला भिडले आहेत. काही दिवसांपूर्वी साठ रुपये डझन या दरात बाजारात मिळणारी अंडी आता 80- 90 रुपयांपर्यंत पोहोचली आहेत. त्यामुळे या अचानक झालेल्या दरवाढीचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे.   


मागच्याच महिन्यात अंडी साठ रूपये डझन या भावाला मिळत होती. आता अंड्याच दर तब्बल 30 रूपयांनी वाढले आहेत. त्यामुळे याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांपासून ते हॉटेल व्यवसायिकांवर पडला आहे. अंड्याचे दर नेमके कशामुळे वाढले हे जाणून घेणं गरजेचं आहे. 


'या' कारणामुळे वाढले अंड्याचे दर 


घाऊक बाजारात दर वाढल्यामुळे किरकोळ बाजारातदेखील अंडी काही रूपयांपेक्षा जास्त महाग आणि विकली जात आहेत. त्यामुळे रोजच्या आहारात अंड्याचा समावेश असणाऱ्या घरांमध्ये या महिन्याचं बजेट मात्र, कोलमडले आहे. 


दरवाढीचा ग्राहकांनाच नाही तर व्यावसायिकांनाही परिणाम 


अंड्याच्या दरवाढीचा परिणाम केवळ ग्राहकांनाच नाही तर अनेक व्यवसायांवर देखील होतो आहे. जसे की, केक शॉप, बेकरी व्यवसाय, हॉटेल व्यवसाय. या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात अंड्याचा वापर केला जातो.  


खरंतर अंड आकाराने लहान असते. पण त्याच अंड्याचे भाव वाढल्यानंतर त्याचा परिणाम समाजातील 90% लोकांवर दिसून येतो. अंड्यांच्या वाढलेल्या भावांमुळे पोल्ट्री व्यवसाय जरी तेजीत असला तरीही इतर व्यवसायांवर याचा परिणाम होत असल्याने अंड्यांच्या वाढत्या भावावर नियंत्रण आणावे अशी मागणी सर्वसामान्य देखील करत आहेत.


महत्त्वाच्या बातम्या : 


Aurangabad Fire : मोठी बातमी! औरंगाबादच्या शहागंज कपडा मार्केटमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल