मुंबई : आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाकडून पहिल्या टप्प्यातील 'ओजस आंतरराष्ट्रीय शाळा' जाहीर करण्यात आल्या आहेत. विविध विभातील 13 जिल्हा परिषदेच्या शाळांचा यामध्ये समावेश आहे.
2018-19 या शैक्षणिक वर्षापासून या शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय बोर्ड सुरु केलं जाणार आहे. यासाठी राज्यातील 378 जिल्हा परिषद शाळांनी ओजस शाळासाठी अर्ज केले होते. यामध्ये 13 शाळांची निवड करण्यात आली.
विभागनिहाय शाळांची नावं
विभाग - अमरावती
बुलडाणा - जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा, वरखेड, चिखली
वाशिम - जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, साखरा, ता.जि. वाशिम
विभाग - औरंगाबाद
उस्मानाबाद - जिल्हा परिषद प्रशाळा, शिराढोण, ता. कळंब
परभणी - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माळीवाडा, ता. पाथरी
विभाग - कोकण
ठाणे - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खर्डी नंबर -1, ता. शहापूर
सिंधुदुर्ग - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चराठे नंबर-1, ता. सावंतवाडी
विभाग - नागपूर
चंद्रपूर - जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, चिंचाळा
गोंदिया - शहीद जिनया तिमया, जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, गोरेगाव
विभाग - नाशिक
नंदुरबार - आंतरराष्ट्रीय निवासी शाळा, तोरणमाळ, ता. धडगाव
नाशिक - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भोयेगाव, ता. चांदवड
विभाग - पुणे
कोल्हापूर - विद्या मंदीर खानापूर, ता. भुदरगड
पुणे - जिल्हा परिषद शाळा, वाबळेवाडी, ता. शिरुर
सातारा - जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, बोपर्डी, ता. वाई
काय आहे आंतरराष्ट्रीय बोर्ड?
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या बोर्डामार्फत विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षण देण्याचा सरकारचा विचार आहे.
या शाळांमुळे इंग्रजी शिवाय मराठी, हिंदी, उर्दू अशा इतर भाषांतील विद्यार्थ्यांना CBSE - ICSE प्रमाणे विषय निवडण्याचं स्वातंत्र्य मिळणार आहे.
जिल्हा परिषदेच्या 13 ओजस शाळा निवडल्या गेल्या. 13 शाळांमध्ये पहिली, दुसरी आणि तिसरीमध्ये या नवीन बोर्डचा अभ्यासक्रम सुरू केला जाईल.
पुढील वर्षी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या 100 शाळा राज्यभरात सुरू केल्या जातील.
या मराठी शाळांमध्ये इंग्रजी आणि इतर भाषेवरील प्रभुत्व वाढवण्यावर भर दिला जाईल. यासाठी ऑनलाइन पद्धतीने शिक्षक निवडले आणि जातील आणि त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अभ्यासासाठी या 13 शाळांची निवड
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 May 2018 09:23 PM (IST)
शिक्षण विभागाकडून पहिल्या टप्प्यातील 'ओजस आंतरराष्ट्रीय शाळा' जाहीर करण्यात आल्या आहेत. विविध विभातील 13 जिल्हा परिषदेच्या शाळांचा यामध्ये समावेश आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -