मुंबई : तब्बल दोन वर्षांनी जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचं नवं रुप समोर आलं आहे. भुजबळांचा नवा अवतार एबीपी माझाच्या हाती लागला आहे.


तुरूंगात जातानाचे भुजबळ आणि या दोन वर्षातलं बदलेलं रुप पूर्णपणे वेगळं आहे.

सोमवारपासून छगन भुजबळ पुन्हा राजकारणात सक्रिय होणार आहेत. मुंबईतल्या केईएम रुग्णालयात कालपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेमंडळी भुजबळांची भेट घेत आहेत.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी छगन भुजबळांची भेट घेतली. भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. मात्र चर्चेचा तपशील अद्याप कळू शकलेला नाही.

काही दिवसांवर आलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुका, आगामी विधानसभा आणि लोकसभांची रणधुमाळी या पार्श्वभूमीवर भुजबळांना मिळालेल्या जामिनावर अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

जामिनानंतर भुजबळ सध्या केईएम रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना स्वादूपिंडाचा त्रास असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

संबंधित बातमी :

PHOTO : सोमवारपासून मैदानात, भुजबळांचा नवा अवतार सर्वात अगोदर एबीपी माझावर