भुजबळांच्या बहुतांश मालमत्ता जप्त, ईडीची कोर्टात माहिती
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई | 08 Dec 2016 03:02 PM (IST)
मुंबई : माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी ईडीने ज्या मालमत्ता जप्त केल्या आहेत, त्यांची यादी आज मुंबई हायकोर्टाला सादर करण्यात आली. भुजबळ यांच्या बहुतांश मालमत्ता या जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती ईडीने कोर्टाला दिली. यावेळी भुजबळांच्या वकीलांनी सुधीर साळसकर आणि अमित बलराज या दोन फरारी व्यक्तींना ईडी अटक करत नसल्याची तक्रार केली. या दोन्ही व्यक्ती ईडीला माहिती देत असल्यानं त्यांना अटक करण्याचे टाळले जातंय, असा आरोप भुजबळांच्या वकीलांनी केला. मात्र असं काहीही नसल्याचं ईडीच्या वकीलांनी स्पष्ट केलं. या दोन्ही व्यक्तींचा शोध घेण्यात यावा, असा आदेश कोर्टाने ईडीला दिला. या पुढील सुनावणी आता 7 फेब्रुवारीला होणार आहे. संबंधित बातम्या :